न्या. हंद्याला लक्ष्मीनारायणस्वामी दत्तू यांना रविवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. त्यांचा कार्यकाल १४ महिन्यांचा राहणार आहे. दत्तू यांनी टू जी घोटाळ्यासह अनेक महत्त्वाच्या खटल्यांचे काम पाहिले आहे. हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी पार पडला.