26 September 2020

News Flash

वैद्यकीय तपासणी करण्यास कर्णन यांचा स्पष्ट नकार

आपली प्रकृती ठणठणीत असून मनही स्थिर आहे

| May 5, 2017 03:00 am

न्यायाधीश सी.एस.कर्णन

आपली प्रकृती ठणठणीत असून मनही स्थिर आहे, असे सांगून कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी.एस. कर्णन यांनी गुरुवारी येथील एका शासकीय रुग्णालयाच्या चार डॉक्टरांच्या चमूकडून स्वत:ची वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला.

या नकारानंतर, ‘मी पूर्णपणे तंदुरुस्त असून माझे मन:स्वास्थ्यही चांगले असल्यामुळे मी वैद्यकीय उपचार करून घेण्यास नकार दिला’, असे लेखी वक्तव्य न्या. कर्णन यांनी डॉक्टरांना दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे माझा अपमान आणि छळ झाला असल्याचे माझे स्पष्ट मत आहे, असे ते म्हणाले.

अशाप्रकारची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पालकांच्या संमतीची आवश्यकता असते. माझे कुटुंबीय इथे नसल्यामुळे अशी मंजुरी मिळू शकत नाही व म्हणून कुठलीही वैद्यकीय चाचणी घेतली जाऊ शकत नाही, असे न्या. कर्णन यांनी सांगितले.

कोलकात्याच्या शासकीय रुग्णालयाने स्थापन केलेल्या डॉक्टरांच्या चमूने न्या. कर्णन यांची वैद्यकीय तपासणी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला होता. या कामात वैद्यकीय चमूला मदत करण्याकरता पोलीस अधिकाऱ्यांचे एक पथक स्थापन करावे, असेही सरन्यायाधीश जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यांच्या पीठाने प. बंगालच्या पोलीस महासंचालकांना सांगितले होते. त्यानुसार चार सदस्यांचा डॉक्टरांचा चमू आज सकाळी न्यू टाऊनमधील न्या. कर्णन यांच्या घरी गेला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 3:00 am

Web Title: justice karnan declines to medical examination
Next Stories
1 हिंदी सक्तीसाठी न्यायालयाचा नकार
2 Ram Vilas Paswan: स्वत:हून ठरावावर सही केलीत; मग मोदींवर टीका कशाला?
3 गोव्यात खुलेआम मद्यपान कारागृहास पात्र
Just Now!
X