News Flash

निर्भया प्रकरण: सुनावणी सुरु असताना न्यायमूर्तींना सुप्रीम कोर्टात भोवळ

निर्भया प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे

(संग्रहित छायाचित्र)

सुप्रीम कोर्टान निर्भया प्रकरणाची सुनावणी सुरु असताना न्यायमूर्ती भानुमती यांना भोवळ आली. सुनावणी सुरु असतानाच त्यांची शुद्ध हरपली. यानंतर भानुमती यांना महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कक्षात नेण्यात आले. सुप्रीम कोर्टात ही बाब घडल्याने निर्भया प्रकरणात केंद्र सरकारवरच्या याचिकेवरची सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी विनय शर्मा याने आपण मानसिकदृष्ट्या सक्षम नसल्याची याचिका केली होती. मात्र विनय हा मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याचं म्हणत सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली. यानंतर न्या. भानुमती या निर्भया प्रकरणातील दोषींना स्वतंत्रपणे फाशी देण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेत होत्या. त्यावेळीच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना चक्कर आली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 5:14 pm

Web Title: justice r banumathi fainted during the hearing in 2012 delhi gang rape case in supreme court today scj 81
Next Stories
1 मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी कॉलेजने ६८ विद्यार्थिनींना काढायला लावली अंतर्वस्त्रे
2 1.47 लाख कोटी रुपये भरा; एअरटेल, व्होडाफोनला सुप्रीम कोर्टाचा आदेश
3 निर्भया प्रकरण: सुप्रीम कोर्टाने फेटाळली आरोपी विनय शर्माची मानसिक स्थिती बिघडल्याची याचिका
Just Now!
X