News Flash

प्रशासन अजूनही आमचे दुःख समजू शकलेले नाही – निर्भयाची आई

मी रस्त्यावर उभी राहून ओरडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी योग शिकण्यात व्यस्त होते.

Mother of Nirbhaya at a thrid year memorial for the girl who was gangraped, tortured and murdered on this day in 2012 in a moving bus in New Delhi. Express Photo by Tashi Tobgyal New Delhi 161215

मी रस्त्यावर उभी राहून ओरडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी योग शिकण्यात व्यस्त होते. त्यांना फिरण्यातून वेळच मिळत नाही, देशात काय चाललेय याची त्यांना माहितीच नाही. कायदा व्यवस्था आणि प्रशासन अजूनही आमचे दुःख समजू शकलेले नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया सामूहिक बलात्काराला बळी पडलेल्या निर्भयाच्या आईने दिली आहे. तसेच, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी सकाळीच सर्वोच्च न्यायालयात दाद का मागितली नाही, असा सवाल निर्भयाच्या आईने केला असून, ही निव्वळ दिशाभूल असल्याचा आरोप केला आहे.
‘निर्भया‘ सामूहिक बलात्कार प्रकरणातील प्रमुख गुन्हेगाराची आज सुटका  होणार आहे. यासंबधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी उद्या होणार आहे. या सामूहिक बलात्कार प्रकरणातील तत्कालीन अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला विरोध करत दिल्ली महिला आयोगाने शनिवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.  मात्र दोषीच्या सुटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार तर दिला आणि याचिकेवर पुढील सुनावणी सोमवारी होईल असे स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:00 pm

Web Title: juveniles release dcw files special leave petition sc refuses to give urgent hearing
टॅग : Nirbhaya
Next Stories
1 आम्रपाली एक्सप्रेसचे सात डब्बे रुळावरुन घसरले
2 निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपी आज सुटणार
3 भारताविरोधात विधाने करू नका!
Just Now!
X