16 October 2019

News Flash

तीन आठवड्यात मतदार यादीतून नाव गायब, ज्वाला गुट्टाचा आरोप

दोन आठवड्यांपूर्वी ऑनलाइन यादी तपासली तेव्हा नाव होतं आता गायब झालं असंही ज्वालानं म्हटलं आहे

ज्वाला गुट्टा (संग्रहीत छायाचित्र)

मतदार यादीतन माझे नाव तीन आठवड्यात गायब झाले असा आरोप बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने केला आहे. २-३ आठवड्यांपूर्वी मी मतदार यादी ऑनलाइन चेक केली होती. त्यावेळी माझे आणि माझ्या आईचे नाव त्या यादीत होते. तर माझ्या वडिलांचे आणि बहिणीचे नाव यादीतून गायब होतो. मात्र आज मतदानाच्या दिवशी यादीत माझे नावच नव्हते त्यामुळे मी मतदान करू शकले नाही असेही ज्वाला गुट्टाने म्हटले आहे. माझे नाव मतदारयादीतून कसे काय गायब झाले हे मलाही कळत नाही. मागील १२ वर्षांपासून मी तेलंगणची रहिवासी आहे. असे असतानाही माझे नाव मतदार यादीतून गायब झाले असेही ज्वाला गुट्टाने म्हटले आहे.

First Published on December 7, 2018 2:45 pm

Web Title: jwala gutta says her name is missing from voters list