News Flash

ज्योतिरादित्य सिंधियांनी दिलं ट्विटर ‘बायो’वरून काँग्रेस हटवण्याच कारण…

जाणून घ्या सध्या सुरू असलेल्या चर्चांबाबतही काय म्हणाले

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसपासून अलिप्त होत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. कारण, त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरील बायोमधून काँग्रेसच्या पदाचा उल्लेख हटवल्याचे सध्या दिसत आहे. मात्र यावर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्टिकरण दिलं आहे. शिवाय काँग्रेसपासून अलिप्त होत असल्याच्या चर्चा निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

”महिनाभरापूर्वी मी माझ्या ट्विटर अकाउंटवरील बायोमध्ये बदल केला. लोकांनी केलेल्या सूचनांमुळे मी माझा बायो छोटा केला. सध्या यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चांना कुठलाही आधार नाही.” असे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना, महाराष्ट्रात अत्यंत विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. यात कोणतेही दुमत नाही की, जनमत महायुतीसाठी आले होते. मात्र सध्या जी परिस्थिती आहे ती विचित्र आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन होणे अत्यंत गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू आहे. यावर लवकरच तोडगा निघावा हीच माझी इच्छा आहे, असे म्हटले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 25, 2019 1:48 pm

Web Title: jyotiraditya scindias said reason for deleting congress from twitters bio msr 87
Next Stories
1 काश्मीरमध्ये मार्कोस, पॅरा आणि गरुड स्पेशल कमांडो फोर्सेस तैनात
2 सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या: राहुल गांधी
3 धक्कादायक! बहिणीने पळून जाऊन केलं लग्न, भावाने तरुणाच्या धाकट्या भावाला जिवंत जाळलं
Just Now!
X