01 March 2021

News Flash

अमेरिकेत भारतीयाची गोळ्या झाडून हत्या

चेहऱ्यावर मास्क घातलेल्या हल्लेखोराने रेड्डी यांच्यावर गोळ्या झाडल्या.

कोल्हापुरातील यादवनगर परिसरातील माजी महापौरांच्या पतीच्या मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या परिक्षाविधीन सहायक पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला.

अमेरिकेत एका ४८ वर्षीय भारतीय व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. के गोवर्धन रेड्डी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मुळचे तेलंगणातील यदाद्री भुवानगिरी येथील होते. अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील पेन्साकोला शहरात चेहऱ्यावर मास्क घातलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने रेड्डी यांच्यावर गोळी झाडली. ही घटना मंगळवारी रात्री झाली. हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

दोन मुलीचे पिता असलेले रेड्डी पेन्साकोला शहरात काम करत होते. सात वर्षांपूर्वी ते अमेरिकेला स्थलांतरित झाले होते. त्यांच्या मागे पत्नी शोभा, मुलगी श्रेया आणि तुलसी आहेत. या दोघी अनुक्रमे दहावी आणि आठवीत शिकतात.

रेड्डी यांचे मित्र रमेश यांनी माध्यमांना सांगितले की, रेड्डी हे फ्यूल स्टेशनवर कामाला होते. स्टेशन बंद होण्याच्या काही तास आधी ही घटना घडली. चेहऱ्यावर मास्क घालून आलेल्या एका हल्लेखोराने रेड्डी यांच्यावर गोळीबार केला. गोवध्रन रेड्डी एप्रिलमध्ये भारतात येणार होते. गेल्या सात वर्षांत ते एकदाही भारतात आले नव्हते. परंतु, नियतीने त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपासूनच दूर केले. अमेरिकेतील स्थानिक तेलुगू संघटना मृतदेह ताब्यात घेण्यास रेड्डी कुटुंबीयांची मदत करत आहे.

यापूर्वी, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही दरोडेखोरांनी तेलंगणातील एका भारतीय अभियंत्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. मृत व्यक्तीचे नाव साई कृष्णा असे होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 12:06 pm

Web Title: k goverdhan reddy a native of telangana has been shot dead in florida usa
Next Stories
1 आसाराम बापूला दिलासा नाहीच, हायकोर्टाने जामीन अर्ज फेटाळला
2 ‘या’ कारणासाठी राफेल विमानांच्या करारात स्वारस्य नव्हते ; HALच्या अध्यक्षांचे स्पष्टीकरण
3 पुलवामा हल्ल्यानंतर देश दु:खात असताना पंतप्रधान मोदी शूटिंगमध्ये व्यस्त होते – काँग्रेस
Just Now!
X