समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांनी सोमवरी पुन्हा एकादा जातीय व विभाजनवादी वक्तव्य करून धक्का दिला आहे. रामपूरचे खासदार असलेल्या आझम खान यांनी म्हटले की, १९४७ नंतरच्या फाळणीनंतर भारतात राहण्याचा निर्णय घेणाऱ्या मुस्लिमांना आता त्यांच्या निर्णयाची किंमत मोजावी लागत आहे.

टाइम्स नाऊनं याबाबत वृत्त दिले असून म्हटले आहे की, कैरानाचे आमदार नाहिद हसन यांनी, भाजपाला पाठिंबा देणाऱ्या दुकानदारांवर बहिष्कर टाकावा असे मुस्लिमांना आवाहन केले होते. यावर बोलताना आझम खान यांनी म्हटले की, ही खरच दुःखद बाब आहे की, अशी परिस्थिती ओढावली आहे. मात्र या परिस्थितीला जबाबदार कोण आहे? कोणी याची सुरूवात केली? आम्ही (मुस्लिम) परत आलो, आमचे पुर्वज पुन्हा भारतातच राहिले. मागिल ७० वर्षांपासून आम्ही ऐकत आहोत की, एक तर ‘कब्रस्तानात जा नाहीतर, पाकिस्ताना जा’ याला कोण जबाबदार आहे ? असा प्रश्नही आझम खान यांनी केला आहे.

तसेच त्यांनी पुढे म्हटले की, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांनी मुसलमानांना परत येण्याचे आवाहन केले होते, मात्र आज समाजाला वाईट वागणूक दिली जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने नुकतेच आझम खान यांना ‘ भू माफिया’ म्हटले  आहे.