News Flash

आयसिसमध्ये दाखल झालेल्या कल्याणमधील तरुणाचा मृत्यू

सीरियामध्ये लढताना अमन तांडेलचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

आयसिसमध्ये सहभागी झालेल्या कल्याणमधील तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमन तांडेन असे या तरुणाचे नाव आहे. २०१४ मध्ये कल्याणमधील चार तरुण आयसिसमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये अमनचा समावेश होता. सीरियामधील अल रक्काहमध्ये आयसिससाठी लढत असताना अमन मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त द हिंदू या वृत्तपत्राने दिले आहे.

आयसिस संबंधित अनेक संकेतस्थळांवर तांडेल मारला गेल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘हे नेमके कधी आणि केव्हा घडले, हे आम्ही सांगू शकत नाही. मात्र अमन तांडेलच्या कुटुंबीयांनी आणि परदेशातील यंत्रणांनी दिलेल्या माहितीवरुन अमन मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळते आहे. सीरियामध्ये आयसिससाठी लढताना अमन मारला गेला आहे,’ अशी माहिती संरक्षण यंत्रणेच्या अधिकाऱ्याने ‘द हिंदू’ या वृत्तपत्राला दिली आहे.

‘अमन तांडेल दोन वर्षांपासून आयसिससाठी काम करत होता. अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत त्याने सीरियामधील जिहादसाठी काम केले. सीरियन सरकारच्या फौजांसोबत झालेल्या अनेक चकमकांमध्ये अमन तांडेल सहभागी झाला होता. अल रक्काहमधील आयसिसच्या तळांवर सीरियाच्या फौजांनी हल्ला केला. या हल्ल्यात अमन मारला गेला,’ अशा शब्दांमध्ये आयसिसने अमनला टेलिग्रामच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

अमनचे वडिल नईम तांडेल कल्याणमधील गोविंदवाडीमध्ये राहतात. नईम यांना काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. या फोनच्या माध्यमातून त्यांना अमनच्या मृत्यूची माहिती समजली, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

इलेक्ट्रिकल इंजिनीयर असणारा अमन तांडेल आरीब माजिद, फहाद शेख आणि सहीम टांकी यांच्यासोबत २०१४ मध्ये आयसिसमध्ये सहभागी झाला होता. यातील आरीब माजिद नोव्हेंबर २०१४ मध्ये भारतात परतला. यानंतर त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले. तर सहीम टांकी गेल्या वर्षी आयसिससाठी लढताना मारला गेला. याशिवाय फहाद शेख आयसिसचे ट्विटर खाते सांभाळत होता. हे ट्विटर गेल्या वर्षी बंद करण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 2:03 pm

Web Title: kalyan youth aman tandel killed fighting for isis in syria
Next Stories
1 दिल्लीच्या नव्या नायब राज्यपालांना यूपीए सरकारने हटवले होते गृहसचिव पदावरून
2 नोटाबंदीला ५० दिवस पूर्ण, आता पुढे काय?
3 काळा पैसा पांढरा करणाऱ्या रोहित टंडनला ईडीने केली अटक
Just Now!
X