22 October 2020

News Flash

कमलनाथ यांची जीभ घसरली, भाजपा उमेदवारास म्हटले ‘आयटम’!

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक होत केली जोरदार टीका

बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोट निवडणुकांचे वारे सुरू आहे. मध्य प्रदेशमधील पोट निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान, काँग्रेसेच दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथने भाजपाच्या महिला उमेदवाराबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. त्यानी केलेल्या विधानावरून भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे.

मध्य प्रदेशच्या डबरा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषणा दरम्यान म्हटले की, ”सुरेंद्र राजेश आपले उमेदवार आहेत, साध्या-सरळ स्वभावाचे आहेत. हे तिच्या सारखे नाही? काय तिचे नाव? मी काय तिचे नाव घेऊ तुम्ही तर तिला माझ्यापेक्षाही चांगल्याप्रकारे ओळखतात, तुम्ही तर मला अगोदरच सावध करायला हवं होतं, ‘ही काय आयटम आहे’.”

इमरती देवी, त्या माजी आमदारांपैकी एक आहे. ज्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला आहे. इमरती देवी यांना ज्योतिरादित्य शिंदे यांच्या कट्टर समर्थक मानले जाते.

कमलनाथ यांच्यावर शिवराज सिंह भडकले –
माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, “कमलनाथ जी! इमरतीदेवी त्या गरीब शेतकऱ्याच्या मुलीचे नाव आहे, ज्यांनी गावात मजुरी करण्यापासून सुरूवात केली व आज लोकप्रतिनिधीच्या रुपात राष्ट्र निर्माणात मदत करत आहे. काँग्रेसने मला ‘भूखा-नंगा’ म्हटलं आणि एक महिलेसाठी ‘आयटम’ सारख्या शब्दाचा वापर करून आपली विचारसरणी दर्शवली.”

आपल्या आणखी एका ट्विटमध्ये शिवराज सिंह म्हणतात, स्वतःला मर्यादा पुरुषोत्तम म्हणवणारे अशा ‘अमर्यादित भाषे’चा वापर करत आहेत? नवरात्र उत्सवाच्या पवित्र काळात देशातील महिला उपवास करत आहेत. अशावेळी तुमच्या वक्तव्यातून तुमची आखूड बुद्धीचे प्रदर्शन होते. तुम्ही तुमचे शब्द मागे घेतले व इमरतीदेवीसह राज्यातील प्रत्येक मुलीची माफी मागितली तर अधिक चांगले होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 7:02 pm

Web Title: kamal nath called the bjp candidate an item msr 87
Next Stories
1 देशात सामूहिक संसर्ग झालाय, पण…; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच केला खुलासा
2 राखी बांधण्याच्या अटीवर बलात्कारातील आरोपीला जामीन; प्रकरण पोहचलं सुप्रीम कोर्टात
3 शिवसेनेसोबत पुन्हा युती करणार का? अमित शाह यांनी दिलं ‘हे’ उत्तर
Just Now!
X