News Flash

३२ वर्षाच्या सबरीना सिंह अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रेस सचिव

कोण आहेत सबरीना सिंह?

फोटो सौजन्य - सबरीना सिंह टि्वटर

डेमोक्रॅटिक पक्षाच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी सबरीना सिंह यांची प्रचार अभियानासाठी प्रेस सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. सबरीना सिंह या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत. सबरीना सिंह यांनी यापूर्वी डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन उमेदवाराच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी संभाळली आहे.

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी कमला हॅरिस यांची निवड केली आहे. “कमला हॅरिस यांची प्रेस सचिव म्हणून बिडेन हॅरिस यांच्या प्रचार अभियानात सहभागी होण्यासाठी मी खूप उत्साहित आहे. काम सुरु करुन नोव्हेंबरमध्ये विजय मिळवण्यासाठी मी खूप उत्साहित आहे” असे ३२ वर्षीय सबरीना सिंह यानी टि्वटमध्ये म्हटले आहे. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- कोण आहेत अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या कमला हॅरीस? जाणून घ्या…

लॉस एजिल्समध्ये राहणाऱ्या सबरीना सिंह याआधी डेमोक्रॅटिक राष्ट्रीय समितीच्या प्रवक्त्या होत्या. सबरीना सिंह सरदार जे.जे.सिंह यांची नात आहे. ते इंडिया लीग या नॉन प्रॉफिट संघटनेशी संबंधित होते. अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय-अमेरिकन समुदायाच्या हितासाठी ही संघटना काम करते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2020 5:24 pm

Web Title: kamala harris appoints indian american sabrina singh as her press secretary dmp 82
Next Stories
1 बॉलिवूडमधील महाराष्ट्राचा चेहरा हरपला! दिग्दर्शक निशिकांत कामत काळाच्या पडद्याआड
2 बारामुल्लातील दहशतवादी हल्ल्याचा वचपा; लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर सज्जाद ठार
3 LinkedIn वर नोकरी शोधणाऱ्यांची संख्या झाली दुप्पट; जाणून घ्या, किती जणांना मिळाल्या नोकऱ्या
Just Now!
X