कमलेश तिवारी हत्या प्रकरणाचा उलगडा केल्याचा उत्तर प्रदेश पोलिसांचा दावा कुसूम तिवारी यांनी फेटाळून लावला आहे. वारंवार विनंती करुनही पोलिसांनी पुरेशी सुरक्षा प्रदान केली नाही. स्थानिक प्रशासनाने आमच्या कुटुंबाचा विश्वासघात केला असा आरोप कुसूम तिवारी यांनी केली आहे. कुसूम तिवारी कमलेश तिवारी यांची आई आहे.

पोलीस आता काही निरपराध लोकांच्या आमच्यासमोर उभे करतील आणि यांनी माझ्या मुलाची हत्या केली म्हणून सांगतील असे कुसूम तिवारी इंडिया टुडेशी बोलताना म्हणाल्या. कमलेश तिवारी यांनी हिंदू समाज पार्टीची स्थापना केली. शुक्रवारी कमलेश तिवारी यांची लखनऊमधील रहात्या घरी हत्या करण्यात आली. प्रशासनाने त्यावेळीच सुरक्षा दिली असती तर आज ही घटना घडली नसती असे कुसूम तिवारी म्हणाल्या.

योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाल्यानंतर कमलेश तिवारी यांची सुरक्षा कमी करण्यात आली असा आरोप कुसूम तिवारी यांनी केला. दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला अटक केली आहे. या प्रकरणी गुजरात एटीएसनंही मोठी कारवाई केली आहे. गुजरात एटीएसनं तिघांना अटक केली आहे. शुक्रवारी हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची हत्या लखनौमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लखनौ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर तिवारी यांना तातडीनं रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पंरतु मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला.

मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. ज्यानंतर लखनौमधली दुकानंही बंद करण्यात आली होती. त्यांच्या हत्येनंतर लखनौमध्ये तणावाचं वातावरण पसरलं होतं. तसंच सर्व दुकानंही बंद करण्यात आली होती. आता गुजरात एटीएसने मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी गुजरात एटीएसनं तिघांना अटक केली आहे.