जेएनयू छात्रसंघाच्या अध्यक्ष २८ वर्षीय कन्हैयाकुमारने आज, बुधवारी दुपारी हैदराबादेत रोहित वेमुलाच्या आईला भेटून न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली. चालू महिन्यात तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्याने रोहित वेमुला त्याचे आदर्श असल्याचे म्हटले होते.
रोहित वेमुलाची आई, रोहितचे मित्र, काही शिक्षक आणि विरोधी पक्षांनी आरोप केले होते की, विद्यापीठाचे अधिकारी पीएच.डी. स्कॉलर रोहितला केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रय आणि स्मृती ईराणी यांच्या दबाबपोटी निलंबित केले होते. तथापि, मंत्र्यांनी या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा दबाब टाकण्यात आल्याचे आरोप फेटाळले होते. कन्हैयाकुमार यांनी बुधवारी सायंकाळी रोहित वेमुलाचे मित्र आणि समर्थकांना भेटण्याची योजना आखली आहे. त्यांच्या मागण्या कुलगुरू अप्पाराव पोडिले यांनी फेटाळून लावल्या आहेत.
रोहित वेमुला समर्थक विद्यार्थ्यांनी मंगळवारी कुलगुरू अप्पाराव पोडिले यांच्या कार्यालयाला घेराव केला. त्यांना सहा तास बाहेर निघू दिले नाही. विद्यार्थ्यांनी कार्यालयाची मोडतोड व पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेकही केली. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले होते. या प्रकरणात पोलिसांनी बुधवारी विद्यार्थ्यांना अटक केली. यात निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांंच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. यामुळे विद्यापीठ परिरात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे.