News Flash

२२ वर्षीय अभिनेत्रीचा रस्ते अपघातात मृत्यू

तिने एक शो जिंकला होता.

कन्नडमधील छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या अभिनेत्रीचा रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. या अभिनेत्रीचे नाव मेबिना मायकल असे असून तिने वयाच्या २२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. त्यानंतर कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मंगळवारी संध्याकाळी मेबिना तिच्या गावी मैदिकेरी येथे जाण्यास निघाली होती. दरम्यान तिची गाडी एका ट्रॅक्टरला जाऊन धडकली. या अपघातामध्ये तिचे निधन झाले असून तिच्यासोबत असणाऱ्या मित्रांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मेबिनाने Pyaate Hudugir Halli Life हा शो जिंकला होता. तिच्या निधाचे वृत्त समोर येताच या शोचे सूत्रसंचालक अकुल बालाजी यांना धक्काच बसला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत तिला श्रद्धांजली वाहिली आहे. ‘माझी आवडती स्पर्धक आणि Pyaate Hudugir Halli Life पर्व ४च्या विजेतीने अचानक जगाचा निरोप घेणे धक्कादायक आहे. ती आपल्यामध्ये नाही यावर माझा विश्वासच बसत नाही’ असे त्याने ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

मेबियानाला Pyaate Hudugir Halli Life या शो मुळे लोकप्रियता मिळाली होती. या शोमध्ये स्पर्धकांना आपले घर सोडून दुसऱ्या एका गावात जाऊन रहावे लागते. सर्व सोयीसुविधा सोडून त्यांना गावात राहावे लागते. या शोमधून मेबियाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2020 5:02 pm

Web Title: kannada tv actress mebina michael dead in road accident avb 95
Next Stories
1 २५ मे रोजी केला विमानप्रवास २६ मे रोजी निघाला करोना पॉझिटीव्ह; एका प्रवाशामुळे ४१ जण क्वारंटाइन
2 कर्नाटकातील धार्मिक स्थळं १ जूनपासून खुली होणार?; येडियुरप्पांनी मागितली पंतप्रधानांकडे परवानगी
3 युद्धाचा राग देणाऱ्या चीनला सूचक इशारा, एअर फोर्समध्ये घातक ‘तेजस’च्या स्क्वाड्रनचा समावेश
Just Now!
X