26 September 2020

News Flash

कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री रेखा सिंधूचे अपघाती निधन

..त्या तिघांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

कन्नड टेलिव्हिजन अभिनेत्री रेखा सिंधूचा कार अपघातात मृत्यू झाला. सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, सिंधू तिच्या तीन मित्रांसोबत कारमध्ये असताना हा अपघात झाला असून, त्या तिघांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. वेल्लोर तालुक्यातील पेरनांबुत जवळील सुन्नामपुकुत्ताई गावात हा अपघात झाला.

चेन्नईकडून बंगळुरुकडे जाताना झालेल्या या भीषण अपघातामध्ये त्या कारचं पूर्णपणे नुकसान झालं असून, कारमध्ये असलेल्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला. रेखा सिंधूशिवाय या अपघातामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींची नावं अभिषेक कुमारन (२२), जयंकंद्रन (२३) आणि रक्षण (२०) अशी असून, त्यांचे मृतदेह तिरूपत्तूर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

याप्रकरणी पोलीस तपास सुरु असून, संबंधित अपघाताविषयीची अधिक माहिती हाती येण्याची सर्वजण वाट पाहत आहेत. या अपघातात मृत झालेल्या अभिनेत्री रेखाने आजवर काही कन्नड आणि तामिळ कार्यक्रमांमध्ये काम केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 1:16 pm

Web Title: kannada tv actress rekha sindhu died in car accident
Next Stories
1 Nirbhaya Gangrape Case: निर्भया बलात्कार प्रकरणी दोषींना फाशीच, सुप्रीम कोर्टाचा निकाल
2 Air India Issues :एअर इंडिया बेशिस्त प्रवाशांचे ‘पंख’ छाटणार! हवाईबंदीचा नियम
3 घोटाळेबाज अधिकाऱ्याला सीबीआयपासून वाचवण्यासाठी ‘अखिलेश’ सरकारने खर्च केले २१ लाख
Just Now!
X