News Flash

अमेरिकेने दिली टिप, दिल्लीतून आयसिसच्या संशयित हस्तकाला अटक

संशयित हस्तकाकडून पोलिसांनी बनावट पासपोर्टही जप्त केला

संग्रहित छायाचित्र

तुर्कीतून परतणाऱ्या आयसिसच्या हस्तकाला दिल्ली विमानतळावरुन अटक करण्यात आली. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएने भारतीय यंत्रणांना टिप दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या संशयित हस्तकाकडून पोलिसांनी बनावट पासपोर्टही जप्त केला आहे.

केरळमधील कन्नूरचा रहिवासी असलेला ३० वर्षाचा तरुण बनावट पासपोर्टच्या आधारे तुर्कीत गेला होता. तुर्कीतील विमानतळावर त्या तरुणाला अटक करण्यात आली होती. बनावट पासपोर्टच्या आधारे प्रवेश केल्याने त्याला तु्र्की पोलिसांनी अटक केली होती. संशयित हस्तक हा सीरियात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होता. या तरुणाला पुन्हा भारतात पाठवण्यात आले होते. मंगळवारी दिल्ली विमानतळावर आगमन होताच दिल्ली पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने त्या तरुणाला अटक केली. संशयित हस्तकाचा आयसिसशी असलेल्या संबंधांचा सध्या तपास सुरु असून चौकशीनंतरच पुढील माहिती देऊ असे पोलिसांनी सांगितले. अटक केलेला तरुण हा सीरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होता अशी माहितीही समोर येत आहे. केरळमधून आयसिसमध्ये भरती होण्यासाठी सीरियात गेलेल्या तरुणांशीही तो संपर्कात होता असा अंदाज आहे. या तरुणाने यापूर्वीही सीरियात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 12, 2017 11:22 am

Web Title: kannur based suspected operative for islamic state arrested by delhi police from igi airport
Next Stories
1 तेजस्वीच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही- लालूप्रसाद यादव
2 रेल्वे अॅपवरुन आता विमान तिकिटही बुक करता येणार
3 जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलांची कारवाई
Just Now!
X