News Flash

उत्तर प्रदेश : चालत्या ट्रकमध्ये सामूहिक बलात्कार करून महिलेस फेकले

चालत्या ट्रकमध्ये चार जणांनी एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला भोगनीपूर येथे फेकून देण्याची घटना घडल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

| December 21, 2013 01:18 am

चालत्या ट्रकमध्ये चार जणांनी एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला भोगनीपूर येथे फेकून देण्याची घटना घडल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले. येथील नौबास्ता बायपास मार्गावर सदर महिला ट्रकमध्ये बसली आणि तिने भोगनीपूर येथे आपल्याला सोडण्याची विनंती केली. काही वेळानंतर आणखी तीन जण त्या ट्रकमध्ये बसले आणि त्यांनी या महिलेवर चालत्या ट्रकमध्येच बलात्कार केला.या प्रकाराने सदर महिलेची शुद्ध हरपताच तिला रसत्यावर फेकून देऊन आरोपींनी तेथून पळ काढला. रस्त्याच्या कडेला ही महिला बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळल्याने पादचाऱ्यांनी त्याची खबर पोलिसांना दिली. पोलिसांनी तिला रुगाणालयात दाखल केले. या महिलेची नंतर तेथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले. तिघा आरोपींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी पीडित महिला आणि आरोपी यांच्यात पूर्ववैमनस्य होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. सदर महिलेची वैद्यकीय तपासणी केली जात असून पुढील तपास सुरू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2013 1:18 am

Web Title: kanpur woman allegedly gangraped thrown out of truck
Next Stories
1 सुदान : बंडखोरांच्या हल्ल्यात तीन भारतीय सैनिक ठार
2 साखर उद्योगांना बिनव्याजी कर्जे आणि कांद्याच्या निर्यातमूल्यात घट
3 खोब्रागडे यांनी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळेच कारवाई-भरारा
Just Now!
X