05 March 2021

News Flash

कन्सास गोळीबाराचा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला निषेध

'कन्सासमध्ये जे काही घडले ते दुःखद होते'

kansas shooting: श्रीनिवास कुचिभोतला

कन्सासमध्ये श्रीनिवास कुचिभोतला या ३२ वर्षीय तरुणाची वंशभेदातून हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येची ही घटना धक्कादायक असून आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत असे व्हाइट हाउसने म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माध्यम सचिव शॉन स्पायसर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ट्रम्प यांच्या वतीने ही प्रतिक्रिया दिली. कन्सासमध्ये जे काही घडले ते दुःखद होते, असे त्यांनी म्हटले होते. श्रीनिवास आणि अलोक मदासानी हे दोघेजण एका बारमध्ये बसलेले होते. अमेरिकन नौदलातील माजी अधिकाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या देशातून चालता हो असे म्हणत त्याने गोळीबार केला. या घटनेमध्ये अलोक हा जखमी झाला आहे.

श्रीनिवास याला वाचवण्यासाठी समोर आलेल्या इयान ग्रिलोटला देखील गंभीर जखम झाली आहे. स्पायसर यांनी यावेळी विद्वेषातून होणाऱ्या घटनांचा निषेध केला. धर्म आणि वंशाच्या आधारे होणाऱ्या भेदभावाला या देशात स्थान नाही असे त्यांनी म्हटले. धर्म आणि वंशाच्या मुद्दावरुन होणाऱ्या हिंसा थांबाव्यात यासाठी ट्रम्प प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत असे ते म्हटले. अमेरिकेच्या स्थापनेपासून येथे नागरिकांच्या स्वातंत्र्याची जपणूक केली जाते असे ते म्हणाले. प्रत्येकाला त्याच्या इच्छेप्रमाणे उपासना करण्याचा अधिकार असल्याचे स्पायसर यांनी म्हटले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मूलभूत हक्कांचे संवर्धन व्हावे समर्पित भावनेने काम करत असल्याचे स्पायसर यांनी म्हटले.

श्रीनिवास आणि आलोकवर गोळीबार सुरू असताना अ‍ॅडमला अडवण्याची हिंमत दाखवणारा इयान ग्रिलोट हा २४ वर्षीय तरुण सध्या समाजमाध्यमावर चर्चेचा विषय बनला आहे. गोळीबारादरम्यान एका टेबलाखाली लपलेल्या इयानने अ‍ॅडमने गोळ्यांचा वर्षांव केल्यानंतर त्याला पाठीमागून पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या झटापटीत अ‍ॅडमने त्याच्यावरही गोळी झाडली. इयानवर सध्या उपचार सुरू आहेत. अ‍ॅडमने गोळ्या झाडल्या त्या वेळी आपण त्या मोजल्या. सहा गोळ्या त्याने झाडल्याने आता त्याच्या रिव्हॉल्व्हरमधील गोळ्या संपल्या असतील असा आपला हिशेब होता. मात्र तो चुकल्याने गोळी लागल्याचे इयान म्हणतो. मात्र केलेल्या कृत्याचा त्याला अभिमान आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या इयानच्या कृतीवर जगभरातून त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली जात आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 12:20 pm

Web Title: kansas shooting white house shrinivas kuchibhotla
Next Stories
1 आंध्रप्रदेशात कालव्यात बस कोसळल्याने १० जणांचा मृत्यू
2 वादविवादापासून दूर राहण्यासाठी गुरमेहर दिल्ली सोडणार
3 ऑस्कर सोहळ्यात ट्रम्प यांच्यावर सडकून टीका
Just Now!
X