मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचे वर्णन काँग्रेसने निराशाजनक अशा शब्दांत केले आहे. त्यात साजरे करण्यासारखे काय आहे असा सवाल काँग्रेसने केला आहे. द्विवर्षपूर्ती निमित्त देशभर कार्यक्रम सुरूअसतानाच काँग्रेसने सरकारवर टीका केली आहे.
देशभर खरच प्रगती आहे काय अशी विचारणार काँग्रेस प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी केली आहे. केवळ पोकळ घोषणांमध्ये सरकारची दोन वर्षे गेल्याचा आरोप त्यांनी केला. आर्थिक किंवा परराष्ट्र धोरणाबाबत यापूर्वीच्या मनमोहन सिंग सरकारच्या कामगिरीची तुलनाच करता येणार नाही. सरकारला चर्चेचे आव्हान काँग्रेसने दिले. मनमोहन सिंग बोलत नसले तरी त्यांचे काम खूप काही सांगायचे. मात्र मोदी नुसतेच बोलतात, मात्र त्यांचे काम काहीच नाही. मोदींचा वाराणसी मतदारसंघ स्वच्छ झाला आहे काय असा सवाल सिब्बल यांनी केला. या वेळी काँग्रेसने ‘ प्रगती की थम गई चाल, दो साल देश का बुरा हाल’ ही चित्रफीत काँग्रेसतर्फे काढण्यात आली.

विकासाचे नवे मापदंड – शहा
नवी दिल्ली: केंद्र सरकारने दोन वर्षांच्या कालावधीत विकासाचे नवे मापदंड निर्माण करत, वचनपूर्ती करीत, सुशासन निर्माण केल्याचे भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले.भ्रष्टाचारमुक्त शासन देत मंत्र्यांनी जनहिताच्या योजना राबवल्याने देशाला नव्या उंचीवर नेल्याचे शहा यांनी ट्विप्पणी केली आहे. ‘सब का साथ सब का विकास’ या न्यायाने सरकारने काम केल्याचे शहा यांनी निदर्शनास आणून दिले.