News Flash

प्रियंका गांधी ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक?; कपिल सिब्बलांनी दिले संकेत

भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा दिली होती. तोच धागा पकडत आता कपिल सिब्बल यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या मोठ्या राज्यांमध्ये सत्ता मिळवलेल्या काँग्रेसमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.

प्रियंका गांधी यांच्या राजकारणात प्रवेशानंतर काँग्रेसमधील लहान-थोरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशात मोदी-शहाला शह देण्यासाठीच काँग्रेसने ही खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रियंका आल्यामुळे आता मोदीमुक्त वाराणसी आणि योगीमुक्त गोरखपूर होणार असल्याचे म्हणत या दोन मतदारसंघातून प्रियंका निवडणूक लढवणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.


यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा दिली होती. तोच धागा पकडत आता कपिल सिब्बल यांनी शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मोदी आणि शहा यांनी काँग्रेसमुक्त भारताचे आवाहन केले होते. मात्र, आता प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात दाखल झाल्यामुळे आपल्याला ….मुक्त वाराणसी?….मुक्त गोरखपुर? पहायला मिळेल.

काँग्रेसने काल (दि.२३) अचानक प्रियंका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने प्रियंका गांधींना निवडणूकीच्या रणांगणात उतरवल्याने ही निवडणूक रंजक होणार असल्याचे बोलले जात आहे. राजकीय वर्तुळातून प्रियंका यांच्या राजकीय प्रवेशावरुन अनेक आडाखेही बांधले जात आहेत. माध्यमांनी तर प्रियंका यांच्या निवडीला काँग्रेसचे ब्रह्मास्त्र असे संबोधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 1:42 pm

Web Title: kapil sibal indicate that priyanka gandhi might become congress candidate against pm modi
Next Stories
1 कन्हैयाचं माहित नाही, पण मोदींनी केला तो देशद्रोह नाही का? : केजरीवाल
2 ‘इटलीला परत जा’, शेतकऱ्यांची राहुल गांधीसमोर घोषणाबाजी
3 महिलेचा पाठलाग करणाऱ्या तिघांना अटक, निघाले पतीने नेमलेले डिटेक्टीव्ह
Just Now!
X