01 March 2021

News Flash

“काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव ही सामान्य बाब वाटत असावी”

कपिल सिब्बल यांचा आपल्याच पक्षाला घरचा अहेर

लोकांना आमच्याकडून अपेक्षा उरलेल्या नाहीत. काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा असं म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्षालाच घरचा अहेर दिला आहे. काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या २२ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.

आता द इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे की बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडले होते. तर उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जनमताचा संदेश स्पष्ट आहे की त्यांनी आपल्याला नाकारले आहे असंही कपिल सिब्बल म्हणाले आहेत.

“बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्ष नेतृत्वाला फारसे गांभीर्य नाही. या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर आलेले नाही. कदाचित सगळं काही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे असे पक्ष नेतृत्वाला वाटत असावे” अशी टीकाही सिब्बल यांनी केली.

आपल्या पक्षाची मोठी घसरण होते आहे ही बाबत काँग्रेसने सर्वात आधी स्वीकारायला हवी. आपलं कुठे चुकतं आहे? हे काँग्रेसला चांगलेच ठाऊक आहे. मात्र त्याबाबत कोणीही काहीही बोलायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहिल अशीही भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 10:06 am

Web Title: kapil sibal says leadership not taking up issues polls show congress is not choice of people scj 81
Next Stories
1 विराट अनुष्काचा कुत्रा ! कोहलीचं समर्थन करताना काँग्रेस नेत्याने पातळी सोडली
2 “बिहार निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी शिमल्यात लुटत होते पिकनिकची मजा”
3 वॉशिंग्टनमध्ये धुमश्चक्री
Just Now!
X