17 January 2021

News Flash

…आणि कराची शहराची झोप उडाली, IAF ने बालाकोट २ केल्याच्या भितीने रात्रभर टेन्शनमध्ये

एअर स्ट्राइकचे भय कायम आहे.

पाकिस्तानी जनता अजूनही बालाकोट एअर स्ट्राइक विसरलेली नाही. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच्या मनात अजूनही या एअर स्ट्राइकचे भय कायम आहे. मंगळवारी रात्री पुन्हा एकदा याची प्रचिती आली. इंडियन एअर फोर्सची फायटर विमानं नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात घुसली आहेत. कराचीच्या आकाशात ही विमान घिरटया घालत आहे अशी चर्चा मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी पाकिस्तानी सोशल मीडियावर रंगली होती.

IAF च्या फायटर विमानांमुळे कराचीमध्ये काळोख करण्यात आला असे पाकिस्तानच्या एका सोशल मीडिया युझरने म्हटले आहे. कराचीमध्ये ब्लॅकआऊट झाल्याने भारताच्या फायटर विमानांनी बालाकोट सारखा पुन्हा एअर स्ट्राइक केला असे काही जणांनी टि्वटरवर म्हटले होते.

कराची शहराजवळ IAF ची विमाने उड्डाण करताना दिसल्यामुळे काळोख करण्यात आला असे काही टि्वटर युझर्सनी म्हटले आहे. ‘विमानतळाजवळ मी जेट विमाने बिघतली व्हॉट्स अप’ असे कराचीमधल्या लारैब मोहीबने विचारले. ‘कराचीजवळ अनेक फायटर विमाने उड्डाण करत आहेत’ असे कराचीमधल्या आणखी एका रहिवाशाने सांगितले.

“IAF ची फायटर विमाने पीओके आणि सिंधमध्ये घुसल्याच्या अफवा पसरल्या आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दोघांनी नेमकं काय ते स्पष्ट करांव. आता सर्वांनी शांतपणे झोपा” असे पाकिस्तानी पत्रकार वज खान यांनी टि्वट केलं. काहींनी रात्रीच्या अंधारातील फायटर विमानांच्या आवाजाचे व्हिडीओ सुद्धा पोस्ट केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2020 4:46 pm

Web Title: karachi blackout leads to twitter chatter about iaf attack dmp 82
Next Stories
1 “…अन्यथा करोनाचा विजय होईल”, अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली भीती
2 जीव वाचवणाऱ्या हत्तीच्या उपकारांची त्यांनी जाण ठेवली, सव्वा सहा एकर जमीन केली नावावर
3 इम्रान खान साइडलाइन? पाकिस्तानवर लष्कराने घट्ट केली पकड
Just Now!
X