23 September 2020

News Flash

कराचीत पोलीस बसगाडीवर आत्मघातकी हल्ल्यात १३ ठार

कराची शहरात एका तालिबानी आत्मघातकी हल्लेखोराने पोलिसांच्या बसगाडीवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत १३ जण ठार झाले, तर ५० जण जखमी झाले.

| February 14, 2014 02:39 am

कराची शहरात एका तालिबानी आत्मघातकी हल्लेखोराने पोलिसांच्या बसगाडीवर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक दिल्याने झालेल्या दुर्घटनेत १३ जण ठार झाले, तर ५० जण जखमी झाले. पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बाहेरच करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबदारी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने स्वीकारली आहे.
कराची शहराजवळच असलेल्या शाह लतीफ येथे प्रशिक्षण केंद्राबाहेर ही बस येताच आत्मघातकी हल्लेखोराने त्या बसला लक्ष्य केले. सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांना घेऊन ही बस जात असताना हल्ला करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.या हल्ल्यात ११ पोलिसांसह दोन नागरिक ठार झाले. या हल्ल्यात अन्य ५० जण जखमी झाले असून त्यापैकी १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 2:39 am

Web Title: karachi explosion kills 13 policemen injures 57
Next Stories
1 कुपोषणाच्या उच्चाटनासाठी युद्धपातळीवर प्रयत्न -मोदी
2 आसामवर सहा राज्यांचे अतिक्रमण
3 देवदासी प्रथा बंद करण्याचे कर्नाटक सरकारला आदेश
Just Now!
X