कर्नाटकच्या जनतेला चांगले प्रशासन हवे आहे. त्यामुळेच त्यांनी भाजपाला निवडले आहे. भाजपाचा हा मोठा विजय आहे. काँग्रेस एकामागोमाग एक निवडणुकीत पराभूत होत आहे तर भाजपा एकामागोमाग एक-एक राज्य जिंकत असल्याचे मत भाजपाचे कर्नाटकचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

कर्नाटकच्या माध्यमातून भाजपाने पुन्हा एकदा दक्षिणेत पर्दापण केले आहे. भाजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. मुख्यमंत्रिपदाचे भाजपाचे उमेदवार येडियुरप्पांनी तर निवडणुकीपुर्वीच आपल्या शपथविधीची तारीख जाहीर केली होती. त्यांच्या या घोषणेला विरोधी पक्षांनी अतिआत्मविश्वासाची उपमा दिली होती. परंतु, निकाल पाहता त्यांचा दावा खरा ठरला आहे. कर्नाटकच्या भाजपाची धुरा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने उल्लेखनीय कामगिरी केली. या निवडणुकीत जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, या सर्व शक्यतांना फाटा देत भाजपा बहुमताजवळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर जावडेकर यांनी काँग्रेसवर टीका करत भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला.

कर्नाटकच्या जनतेला चांगले प्रशासन हवे होते. त्यामुळेच त्यांनी भाजपाला निवडल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस एकामागोमाग एक निवडणुका हरत आहे तर भाजपा एकामागोमाग एक-एक राज्य जिंकत असल्याचे त्यांनी म्हटले.