भाजपाची बहुमताकडे वाटचाल सुरू असतानाच दुसरीकडे पुन्हा एकदा इव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करण्यास सुरूवात झाली आहे. इव्हीएम ऐवजी मत पत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपाला अडचण काय आहे, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी उपस्थित केला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. देशातला एकही राजकीय पक्ष असा नाही ज्यांनी इव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे. भाजपानेही एकेकाळी याबाबत विरोधाची भूमिका पार पाडली आहे, असे मोहन प्रकाश यांनी म्हटले आहे.

काँग्रेसच्या निराशाजनक कामगिरीनंतर मोहन प्रकाश यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, भाजपानेही एकेकाळी इव्हीएमला विरोध केला होता. आता देशातील सर्वच पक्ष इव्हीएमच्या विरोधात असताना भाजपाला मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास काय अडचण आहे, असा सवाल त्यांनी भाजपाला विचारला.

‘आता देशात ‘काँग्रेस खोजो’ अभियान सुरू होईल’

त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याच्या सर्व शक्यता भाजपाने खोडून काढत बहुमताकडे वाटचाल केली. अजूनही भाजपा बहुमताच्या काटावर असला तरी पक्षासमोर सध्या तरी कोणतीच अडचण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे लिंगायत बहुल भागातही भाजपाला दणदणीत यश मिळाले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची ही चाचणी परीक्षा असल्याचे देशात बोलले जात होते.

दरम्यान, आता भाजपाच्या विजयानंतर पुन्हा एकदा इव्हीएमचा मुद्दा गाजणार असल्याचे मोहन प्रकाश यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट होत आहे.