21 March 2019

News Flash

..आणि दिल्लीत जाळले मोदींचे प्रतिकात्मक पुतळे

राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापण्याचे निमंत्रण दिल्याने काँग्रेस आणि जेडीएस हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिला.

संग्रहित छायाचित्र

सर्वोच्च न्यायालयाने रात्री उशिरा भाजपा नेते बीएस येडियुरप्पा यांचा शपथविधी रोखण्यास नकार देत याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मध्यरात्री दोनच्या सुमारास दिल्लीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. दुसरीकडे भाजपा कार्यकर्त्यांनी बेंगळुरूतील राजभवनाबाहेर जल्लोष केला.

येडियुरप्पांचा शपथविधी रोखण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. १०४ जागा घेत भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. पण बहुमतासाठी आवश्यक असणारे ११२ हे संख्याबळ गाठण्यात त्यांना अपयश आले आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (७८) आणि जेडीएस (३७) यांनी आघाडी करत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. पण राज्यपालांनी भाजपाला सत्ता स्थापण्याचे निमंत्रण दिल्याने काँग्रेस आणि जेडीएस हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यानंतर युवक काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी एकत्र येत पंतप्रधान मोदी आणि भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी मोदींचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला.

First Published on May 17, 2018 7:58 am

Web Title: karanataka assembly election 2018 youth congress workers burnt symbolic statue of pm modi