Kargil Vijay Diwas २६ जुलै हाच तो दिवस होता, जेव्हा भारताच्या शूर सैनिकांनी हिमशिखरांवर पराक्रम गाजवला आणि पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केलं. हा दिवस १९९९ साली झालेल्या कारगील युद्धाच्या स्मरणार्थ कारगील विजय दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. सियाचीन येथून गोरखा रायफल्सची तुकडी परतीच्या मार्गावर होती, आणि हीच संधी साधत पाकिस्तानच्या घुसखोरांनी भारतीय चौक्यांवर कब्जा केला. मर्यादित साधनसामग्री असताना ज्या जवानांनी अफाट शौर्य आणि साहस दाखवून विजय मिळवून दिला त्यांच्यामध्ये रायफलमॅन सुनिल जंग यांचाही खारीचा वाटा होता. लखनऊमधून शहीद होणारे ते पहिले जवान. १५ मे १९९९ रोजी ते शहीद झाले होते.

सुनील जंग अवघ्या वयाच्या १६ व्या वर्षी गोरखा रायफल्समध्ये भरती झाले होते. १० मे १९९९ रोजी लष्कराकडून सुनील यांना कारगील सेक्टरमध्ये पोहोचण्याचा आदेश मिळाला. ४०० ते ५०० घुसखोर भारतीय हद्दीत घुसले आहेत एवढीच माहिती त्यांना मिळाली होती. तीन दिवसांपर्यत चाललेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये १५ मे रोजी शत्रूची गोळी सुनील जंग यांच्या छातीला भेदून आरपार झाली.

Sarabjit singh pakistan prisoner
बावीस वर्षे पाकिस्तान तुरुंगात हालअपेष्टा सोसलेल्या सरबजित सिंग यांच्या मारेकर्‍याची हत्या; नेमके हे प्रकरण काय होते?
nashik pakistan zindabad slogans marathi news
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर जमावाकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची तक्रार
Operation Meghdoot, Siachen,
विश्लेषण : पाकिस्तानला चकवा देत सियाचिनवर कब्जा… थरारक ‘ऑपरेशन मेघदूत’ मोहीम कशी फत्ते झाली?
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

लहानपणापूसनच गिरवले देशभक्तीचे धडे –
रायफलमॅन सुनील जंग यांनी जन्मापासूनच शूरतेचे धडे गिरवले होते. देशभक्ती त्यांना वडिलोपार्जित मिळाली होती. त्यांचे आजोबा मेजर नकुल जंग आणि पिता नर नारायण जंग यांनीही लष्करात देशाची सेवा केली होती. घरातील हीच परंपरा त्यांनी पुढे सुरू ठेवली. वयाच्या केवळ आठव्या वर्षीच त्यांच्या देशभक्तीचं एक उदाहरण सर्वांसमोर आलं होतं. शाळेमध्ये फॅन्सी ड्रेस कार्यक्रम होता. सुनील देखील या कार्यक्रमात सहभागी झाले. लष्कराच्या गणवेशाची त्यांना इतकी आवड होती की त्यांनी वडिलांचा जुना गणवेश कापून स्वतःसाठी त्याचा ड्रेस तयार केला, आणि फॅन्सी ड्रेस कार्यक्रमाच्या मंचावरुनच त्यांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देईन अशी घोषणाच केली होती, आणि वेळ आल्यावर त्यांनी खरंच अक्षरशः आपल्या शब्दांचं पालन केलं, आपली वचनपूर्ती केली!!!

शौर्यचक्र न मिळाल्याचं दुःख –
सुनील जंग यांची आई बीना यांच्या मनात सुनील यांना मरणोत्तर शौर्यचक्र न मिळाल्याची सल अजूनही कायम आहे. सरकारकडे सातत्याने त्या यासाठी मागणी करत आहेत. सुनील यांची बहिण सुनीता हिला सरकारी नोकरी मिळावी म्हणजे कुटुंबाची आर्थिक चणचण दूर होईल अशी त्यांची इच्छा आहे. सरकारने स्टेडियम बनवण्याचं वचन दिलं होतं तेही अद्याप पूर्ण केलं नसल्याचं बीना म्हणाल्या