News Flash

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण!; मुख्यमंत्री येडीयुरप्पा म्हणाले…

कर्नाटकात भाजपात सर्वकाही अलबेल नसल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर येडीयुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा (सौजन्य-एएनआय)

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. कर्नाटकात भाजपात सर्वकाही अलबेल नसल्याचं सध्या चित्र आहे. त्याचबरोबर येडीयुरप्पा यांचं वाढतं वय पाहता नेतृत्व बदलाचा विचार सुरु असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र या सर्व बातम्यांना मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी आपल्या शैलीत उत्तर दिलं आहे. “भाजपा नेतृत्वाने मला पद सोडण्यास सांगितल्यास मी त्या दिवशीच राजीनामा देईल.” असं त्यांनी स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरी दुसरा पर्याय नसल्याचं सांगायला विसरले नाहीत. तर दुसरीकडे येडीयुरप्पा समर्थक आमदारांनी मुख्यमंत्री त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असंही सांगितलं.

“मला पक्ष नेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं. तर मी तात्काळ राजीनामा देईन. पण मला वाटतं कर्नाटक भाजपात दुसरा पर्याय नाही. जिथपर्यंत दिल्लीतील नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे. तिथपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर राहणार. ज्या दिवशी सांगतील राजीनामा दे, त्या दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र काम करेन” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांनी सांगितलं.

“त्यांचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबतची कोणतीच चर्चा नाही. त्यांनी फक्त वक्तव्य केलं की, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. कारण ते पक्षाचा आदेश मानणारे नेते आहेत.”, असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सीएम नारायण यांनी सांगितलं.

“केंद्र सरकार ‘ब्लू टिक’साठी भांडतंय, तुम्ही आत्मनिर्भर व्हा!” ट्विटर प्रकरणावरून राहुल गांधींचा निशाणा!

२०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपाने सर्वाधिक ११० जागा मिळवत क्रमांक एकचा पक्ष ठरला होता. मात्र बहुमताचा आकडा पक्ष गाठू शकला नव्हता. त्यासाठी त्यांनी ६ अपक्ष आमदारांना गळ घातली होती. मात्र त्यांच्या जीवावर सरकार फार काळ टिकू शकणार नाही याचा अंदाज आल्याने जेडीएस आणि काँग्रेसकडे मोर्चा वळवला होता. याला ‘ऑपरेशन कमळ’ असं नाव देण्यात आलं होतं. सात आमदारांना राजीनामा द्यायला लावून त्यापैकी ५ जण निवडूनही आले होते. कर्नाटकमध्ये भाजपाने २०१९ मध्ये काँग्रेस-जेडीयूचं सरकार पाडलं. त्यानंतर बीएस येडीयुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 4:18 pm

Web Title: karnatak cm bs yediyurappa says i will resign after party high command give order to me rmt 84
Next Stories
1 ‘घर घर राशन’ योजनेच्या स्थगितीवरून भाजपा व केजरीवाल सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप!
2 आसाम Video: मनोबल वाढवण्यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये PPE किट घालून रुग्णांसोबत डान्स
3 West Bengal: ताडपत्री चोरल्याच्या आरोपाखाली भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X