News Flash

प्रबळ इच्छाशक्ती ! 110 वर्षांच्या आजीबाईंनी केली करोनावर मात

करोना व्हायरसबाबत दिलासादायक वृत्त...

(फोटो - एएनआय)

देशात करोनाग्रस्तांचा आकडा 17 लाखांपार गेला आहे. जवळपास 37 हजार जणांना यामुळे जीव गमवावा लागलाय. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात करोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, अशातच कर्नाटकातून एक दिलासायदक वृत्त आलं आहे.

कर्नाटकमध्ये एका 110 वर्षांच्या महिलेने करोनावर मात केली आहे. सिद्दम्मा असं या महिलेचं नाव असून त्या कर्नाटकमधील चित्रदूर्ग येथील रहिवासी आहेत. ’27 जुलै रोजी सिद्दम्मा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना चित्रदूर्गच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर शनिवारी त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला’, चित्रदूर्गचे जिल्हा सर्जन डॉ. बसवराज यांनी याबाबत माहिती दिली.

प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सिद्धम्मा यांनी केवळ करोनावरच मात केली नाहीये तर त्यांनी अन्य लोकांनाही या महामारीविरोधात लढण्याची प्रेरणा दिली आहे. त्यांना शनिवारी पूर्णपणे ठिक झाल्यानंतर रुग्णायलातून घरी सोडण्यात आले.


दरम्यान, कर्नाटकमध्ये शनिवारी करोनाचे नवीन 5,172 रुग्ण झाले. यासोबतच एकूण रुग्णांची संख्या 1.29 लाख झाली आहे. यात आतापर्यंत राज्यात 2,412 लोकांना या महामारीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कर्नाटकचे कृषी मंत्री बी.सी पाटील आणि त्यांच्या पत्नीचा शनिवारी करोना व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. यापूर्वी त्यांच्या जावयालाही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं असून रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यापासून ते घरीच आयसोलेशनमध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2020 11:11 am

Web Title: karnataka 110 year old woman recovered from coronavirus sas 89
टॅग : Coronavirus
Next Stories
1 उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल वरूण यांचा करोनामुळे मृत्यू
2 देशभरात २४ तासांत ५४ हजार ७३६ नवे करोनाबाधित, ८५३ रुग्णांचा मृत्यू
3 अनुपम श्यामसाठी योगी सरकार मदतीसाठी सरसावले; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आदेश
Just Now!
X