सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बीएस येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीआधीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बहुमत सिद्ध करण्यासाठी १११ आमदारांचा पाठिंबा आवश्यक होता. पण भाजपाकडे १०४ आमदार होते. बहुमतासाठी बरेच प्रयत्न करुनही सात आमदारांचा पाठिंबा जमवणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर येडियुरप्पांनी बहुमत चाचणीलासामोरे जाण्याआधी राजीनामा दिला.
‘मी आता १५० पेक्षा जास्त जागा जिंकूनच परत येईन’ असे सांगत येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी ते काहीसे भावूक झाले होते. येडियुरप्पा आता आपला राजीनामा देण्यासाठी राजभवनावर गेले आहेत. येडियुरप्पांना फक्त तीन दिवस कर्नाटकाचे मुख्यमंत्रीपद भूषवता आले.

– भाजपा आमदार आणि हंगामी विधानसभा सभापतींनी राष्ट्रगीताचा अपमान केला, राष्ट्रगीत सुरु होण्याआधीच त्यांनी सभागृह सोडले – राहुल गांधी.

– भाजपाने कर्नाटक, गोवा आणि मणिपूरच्या जनादेशाचा अनादर केला – राहुल गांधी.

– भाजपा देशातल्या कोणीत्याही संस्थेचा आदर करत नाही – राहुल गांधी

– पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी – राहुल गांधी

– नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराविरोधात बोलतात पण एकप्रकारे भ्रष्टाचारालाच खतपाणी घालतात – राहुल गांधी

– कर्नाटकात लोकशाहीवरील आक्रमण रोखण्यात आले – राहुल गांधी

– आम्ही भाजपा, आरएसएसला रोखणार – राहुल गांधी

– देशातील जनतेच्या आवाजाचे रक्षण करणार – राहुल गांधी

– नरेंद्र मोदी या देशातल्या जनतेपेक्षा मोठे नाहीत.

 

– राहुल गांधी थोडयाचवेळात घेणार पत्रकार परिषद
– भाजपाकडे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने बी.एस.येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा दिला राजीनामा

-जनतेने आम्हाला १०४ ऐवजी ११३ जागा दिल्या असत्या तर आम्ही राज्याच नंदनवन केलं असतं – येडियुरप्पा

-माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कर्नाटकाची सेवा करीन

-मी परिवर्तन यात्रा सुरु केली त्यावेळी लोकांचा मला भरपूर पाठिंबा मिळाला – येडियुरप्पा

– गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार बनवण्याचे माझा उद्देश होता – येडियुरप्पा

– मी मागची दोनवर्ष संपूर्ण राज्याचा दौरा केली आणि वेदना, दु:ख लोकांच्या चेहऱ्यावर पाहिले, लोकांकडून मला जे प्रेम मिळाले ते मी कधीही विसरु शकत नाही – येडियुरप्पा

– लोकांनी आम्हाला १०४ जागांचा आशिर्वाद दिला. हा जनादेश काँग्रेस आणि जेडीएसला मिळालेला नाही – येडियुरप्पा

-बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेत मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे

– मी माझ्या भावासोबत ताज वेस्ट एन्ड हॉटेलमध्ये होतो. कोणीही माझ्या संपर्कात नाही, आनंद सिंह आणि प्रताप पाटील यांना मी ओळखत नाही – सोमशेखरा रेड्डी

– बहुमत चाचणीआधी भाजपा खासदार शोभा करंदलाजे यांना काय होणार असे विचारले असता त्यांनी राजकारणात प्रत्येक निर्णय उत्तम असतो, थोडा वेळ थांबा आणि पाहा काय होते अशी हसून प्रतिक्रिया दिली. त्या मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जातात.

– काँग्रेसचे बेपत्ता असलेले दोन आमदार आनंद सिंह आणि प्रताप गौडा पाटील बंगळुरुतील हॉटेलमध्ये सापडले असून भाजपाचे आमदार सोमशेखरा रेड्डी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत.

– कर्नाटकमध्ये संख्याबळाचे गणित फिस्कटल्याने बहुमत चाचणीपूर्वीच येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, असे वृत्त आहे.

– आम्ही शनिवारी १०१ टक्के बहुमत सिद्ध करु, असा दावा येडियुरप्पा यांनी केला होता.

– कर्नाटकमधील २२२ जागांपैकी भाजपा १०४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाने ३७ जागा जिंकल्या आहेत.

– जनता दल सेक्यूलरचे नेते आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कुमारस्वामी हे दोन जागांवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी एक जागा सोडल्यावर सभागृहाचे संख्याबळ २२१ वर येईल.

– विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचे मत गेल्याने संख्याबळ २२० वर येते. अशा स्थितीत बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ १११ इतके आहे. भाजपाकडे सध्या १०४ आमदार असून काँग्रेस- जेडीएस युतीकडे ११५ आमदारांचे पाठबळ आहे.

– कर्नाटक विधानसभेतील बहुमत चाचणीपूर्वी घोडेबाजार तेजीत असून शनिवारी दुपारी काँग्रेसने कथित ऑडिओ क्लिप जाहीर केली आहे. यात येडियुरप्पांच्या निकटवर्तीयांनी काँग्रेस आमदारांना पैसे व मंत्रीपदाची ऑफर दिली आहे.

– भाजपाचा आज जगासमोर पर्दाफाश होणार असून १०४ आमदारांचे संख्याबळ असतानाही विरोधी पक्षातील आमदार विकत घेण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांनी केला आहे.

– भाजपाने काँग्रेसच्या दोन आमदारांचे अपहरण करुन त्यांना डांबून ठेवले आहे, असा गंभीर आरोपही मोईली यांनी केला आहे.

– कर्नाटक विधानसभेचे हंगामी अध्यक्ष के. जी. बोपय्या यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या काँग्रेसला शनिवारी सुप्रीम कोर्टाने दणका दिला. बहुमत चाचणीदरम्यान हंगामी अध्यक्षपदी बोपय्याच असतील असे स्पष्ट करतानाच या बहुमत चाचणीचे वृत्तवाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपण करावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

– कर्नाटक विधानसभेत आज (शनिवारी) होणाऱ्या बहुमत चाचणीत काँग्रेस व जनता दल सेक्युलर या पक्षातील लिंगायत समाजातील २० आमदार भाजपाला साथ देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.