News Flash

… म्हणून येडियुरप्पांनी आपल्या नावाचं स्पेलिंग बदललं

त्यांनी पत्रातही आपल्या नव्या स्पेलिंगचाच वापर केला आहे.

गेले अनेक दिवस कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा अंक गुरूवारी पुन्हा सुरू झाला. विधानसभा अध्यक्षांनी तीन जणांना अपात्र ठरवत मोठा दणका दिला होता. तर दुसरीकडे शुक्रवारी येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. त्यानंतर आज ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पण त्यापूर्वी ते ज्योतिष आणि संख्याशास्त्राच्या फेऱ्यात सापडल्याच्या चर्चा सुरू आहेत. याचं कारणंही तसंच आहे. त्यांनी आपल्या नावाच्या इंग्रजीतील स्पेलिंगमध्ये बदल केल्याचे समोर आले आहे. संख्याशास्त्रज्ञांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्पेलिंगमध्ये बदल केला आहे. यापूर्वी ते yeddyurappa असे स्पेलिंग लिहित होते. परंतु आता त्यांनी आपल्या नावातून ‘D’ काढून त्याऐवजी ‘I’ जोडला आहे.

यापूर्वी 2007 मध्ये येडियुरप्पा हे आपल्या नावाचे स्पेलिंग Yediyurappa असेच करत होते. परंतु त्यानंतर त्यांनी आपल्या याच्या स्पेलिंगमध्ये बदल करत yeddyurappa असे केले होते. त्यांनी नुकतेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना एक पत्र पाठवले आहे. त्या पत्रातही त्यांनी पुन्हा एकदा नव्या स्पेलिंगचा वापर केला आहे. तर विधानसभेतही त्यांच्या नावाच्या बोर्डवर नवे स्पेलिंग लिहिण्यात आले आहे.


दरम्यान, यापूर्वी कुमारस्वामी यांनीदेखील विश्वासमतापूर्वी ताज हॉटेलमधील एक रूम आपल्यासाठी लकी असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटले होते. त्या रूममध्ये आपण वास्तव्यास असतानाच काँग्रेसने आपल्याला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचेही त्यांनी सांगितले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 4:17 pm

Web Title: karnataka bjp bs yeddyurappa changes his name spelling jud 87
Next Stories
1 प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीसह जाहिराती, दुकानांद्वारे रेल्वेची वर्षभरात ३५० कोटींची कमाई
2 अनुराग कश्यपला जीवे मारण्याची धमकी
3 “26/11 च्या हल्ल्यासाठी गुगल मॅप्स आणि इमेजेसचा वापर”, दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
Just Now!
X