गुरुवारी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र यावरुन विधानसभेत गोंधळ झाल्याने कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आले. गुरुवारी काँग्रेस आणि जेडीएसचे १५ बंडखोर आमदार अनुपस्थित होते. दरम्यान भाजपा आमदारांनी विधानसभेतच ठिय्या दिला होता. उशा, चादरी घेऊन भाजपा आमदारांनी कर्नाटक विधानसभेतच मुक्काम केला. आज सकाळी काही आमदार मॉर्निंग वॉकलाही गेले होते.

दरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मुदत राज्यपालांनी दिली आहे. गुरुवारी संध्याकाळनंतर कर्नाटक विधानसभेत भाजपाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन दाखल झाले. तिथेच त्यांनी जेवणही केले आणि मुक्कामही केला. भाजपाचे आमदार चादरी आणि उशा घेऊन विधानसभेत पोहचले होते. आता आज कर्नाटक विधानसभेत काय महाभारत रंगणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.