News Flash

कर्नाटकात भाजपाचीच सत्ता! मुख्यमंत्री झाले येडियुरप्पा

31 जुलैपर्यंत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.

फोटो सौजन्य : एएनआय

भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांनी शुक्रवारी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक अनेक दिवसांपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यानंतर कर्नाटकात पुन्हा एकदा येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी तेथील भाजपा कार्यालयात जाऊन अन्य नेत्यांची भेट घेतली.

कर्नाटकातील 17 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटक सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान कुमारस्वामी यांच्यासमोर होते. परंतु कुमारस्वामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले नव्हते. त्यानंतर कुमारस्वामी यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु भाजपाने त्या ठिकाणी सावध भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्याचे पहायला मिळाले होते. त्यानंतर गुरुवारी कर्नाटकातील राजकीय नाट्याचा दुसरा अंक पहायला मिळाला होता. विधासनसभेच्या अध्यक्षांनी तीन बंडखोर आमदारांना अपात्र ठरवले होते.

त्यानंतर शुक्रवारी सकाळीच येडियुरप्पा यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी तो स्वीकारल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळीच त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतला. आता 31 जुलैपर्यंत येडियुरप्पा यांना आपले बहुमत सिद्ध करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी बंगळुरू येथील भाजपा कार्यालयात काही नेत्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी बंगळुरू येथील काडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन पूजाही केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2019 6:41 pm

Web Title: karnataka bs yeddyurappa takes oath as cm jud 87
Next Stories
1 वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा मागणारी याचिका न्यायालयाने फेटाळली
2 ‘फक्त गायीकडूनच मिळतो ऑक्सिजन’
3 चोर स्लीपर विसरला, पोलिसांनी अवघ्या ४० मिनिटांमध्ये त्याला पकडला
Just Now!
X