News Flash

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे सत्तर लाखाचे घड्याळ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या वापरत असलेले घड्याळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या हातातील हिरेजडीत घड्याळाविषयी कर्नाटकमधील जनता दल (एस) चे नेता कुमारस्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या वापरत असलेले घड्याळ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातातील हिरेजडीत घड्याळाविषयी कर्नाटकमधील जनता दल (एस) चे नेता कुमारस्वामी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. कुमारस्वामींनी केलेल्या दाव्यानुसार सिद्धरामय्या वापरत असलेल्या घड्याळाची किंमत ६८ लाख ५६ हजार असून, कस्टम ड्यूटीसह या घड्याळाची किंमत ७० लाख इतकी होते. सिद्धरामय्यांच्या गॉगलची किंमत दोन लाख रुपये असल्याचा दावादेखील त्यांनी केला आहे. याबाबत सिद्धरामय्या यांना विचारले असता, हा गॉगल मी पन्नास हजारात विकायला तयार असून, दहा लाखात घड्याळसुध्दा विकायला तयार असल्याचे ते म्हणाले. सिद्धरामय्या यांनी ‘केएसआयसी’च्या शो-रुममधून पत्नीसाठी खरेदी केलेली एक लाख नऊ हजार किंमतीच्या वॉटरप्रुफ सिल्क साडीचे वृत्त मागील महिन्यात माध्यमांमधून झळकले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 1:13 pm

Web Title: karnataka chief minister siddaramaiahs 70 lakhs rupees watch
Next Stories
1 ‘स्नॅपडील’ची बेपत्ता दीप्ती घरी परतली, पण..
2 हणमंतप्पा कोप्पड यांच्यावर बेटादूरमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार
3 व्हिडिओ: ‘डीजे’च्या दणदणाटावर थिरकला पोलीस अधिकारी, निलंबनाची कारवाई
Just Now!
X