News Flash

कर्नाटक : मुख्यमंत्री येडियुरप्पांनी केला मंत्रिमडळाचा विस्तार, १७ मंत्र्यांचा समावेश

माजी मुख्यमंत्र्यासह, दोन माजी उपमुख्यमंत्र्यांनाही दिले मंत्रीपद

कर्नाटकात मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले व येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यांनी २६ जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली होती. तर २९ जुलै रोजी विधानसभेत सरकारचे बहुमत सिद्ध केले होते. यानंतर त्यांनी आज (मंगळवार) मंत्रिमडळाचा पहिला विस्तार केला. ज्यामध्ये १७ आमदारांना संधी देण्यात आली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी राजभवनात नव्या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्यात आलेल्यांमध्ये माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांच्यासह के.एस.ईश्वरप्पा व आर.अशोक हे दोन माजी उपमुख्यमंत्री, अपक्ष आमदार एच.नागेश आणि लक्ष्मण सावदी, श्रीनिवास पुजारी यांचा समावेश आहे.

यांच्याशिवाय गोविंद एम. करजोल, अश्वथ नारायण सी. एन, बी. श्रीरामुलु, एस. सुरेश कुमार, वी. सोमन्ना, सी. टी. रवि, बासवराज बोम्मई, जे. सी. मधु स्वामी, सी. सी. पाटील, प्रभु चौहान आणि शशिकला जोले अण्णासाहेब यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.

मंत्रिमडळात स्थान दिल्या गेलेल्या शशिकला जोले अण्णासाहेब ह्या एकमेव महिला आमदार आहेत. कर्नाटकात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत ३४ मंत्रीच असू शकतात. काँग्रेस आणि जेडीयूने मंत्रिमंडळ विस्तारास होणाऱ्या विलंबावरून भाजपावर टीका करत, सरकारच्या अस्तित्वाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. काँग्रेसने म्हटले होते की, येडियुरप्पांचे एक सदस्यीय मंत्रिमंडळ हे राष्ट्रपती राजवटी सारखे वाटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 2:50 pm

Web Title: karnataka chief minister yeddyurappa expand cabinet msr 87
Next Stories
1 ‘नापाक’ हरकतीचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहोत, एअर फोर्स प्रमुखांचा इशारा
2 “मला माझं स्वातंत्र्य हवं होतं”, १५ वर्षीय मुलीने प्रियकरासोबत मिळून केली वडिलांची हत्या
3 पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; भारताकडूनही चोख प्रत्युत्तर
Just Now!
X