News Flash

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा मोठा निर्णय

प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद

संग्रहित

कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी यासंबंधी आदेश दिला आहे. मराठा विकास प्राधिकरणासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून निधी राखीव ठेवण्यात आला आहे. कर्नाटक राज्यात तसंच खासकरुन सीमारेषेवरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजातील नागरिकांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. एएनआयने यासंबधी वृत्त दिलं आहे.

अधिकृत आदेशानुसार, गेल्या कित्येक दशकांपासून कर्नाटक राज्यात वास्तव्यास असणाऱ्या मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा विकास प्राधिकरणाचं मुख्य लक्ष्य समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक विकासाकडे असणार आहे.

बसवकल्याण विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्याच्या आधी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी हा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघात मराठा समाजातील मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेस नेते बी नारायण राव यांचं करोनामुळे निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. बंगळुरुमधील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकीची तारीख जाहीर केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2020 8:41 pm

Web Title: karnataka cm bs yediyurappa sets aside 50 crore for formation of maratha development authority sgy 87
Next Stories
1 बिहारमध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत सस्पेन्स; भाजपाचे तारकिशोर व रेणुदेवी शर्यतीत
2 बिहारमध्ये नाराजीनाट्य रंगणार? सुशीलकुमार मोदींच्या ट्विटमुळे चर्चेला उधाण
3 “नितीश कुमारांना कंट्रोलमध्ये ठेवण्याचं रिमोट दुसऱ्या कुणाकडे तरी असणार”
Just Now!
X