कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यापाठोपाठ त्यांच्या मुलीलाही करोनाची लागण झाली आहे. तिला बंगळुरुच्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. येडियुरप्पा यांनी काल रात्री ट्विटकरुन त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती दिली. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे असे येडियुरप्पा यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
येडियुरप्पा यांना सुद्धा मणिपाल रुग्णालयात दाखल केलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याचे रुग्णालयांनी डॉक्टरांनी सांगितले. मणिपाल रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. येडियुरप्पा ७८ वर्षांचे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाही करोना चाचणीचा रिपोर्ट काल पॉझिटिव्ह आला. यापूर्वी २५ जुलै रोजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही ट्विट करुन मला करोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती दिली होती.
Karnataka CM BS Yediyurappa’s daughter has tested positive for #COVID19. She has been admitted to the hospital: Manipal Hospital, Bengaluru
— ANI (@ANI) August 3, 2020
“माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 9:14 am