News Flash

रवी पुजारीच्या अटकेच्या श्रेयावरून वाद

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर भाजपची टीका

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर भाजपची टीका

कुख्यात गुंड रवी पुजारी याला सेनेगलमध्ये अटक करण्यात आल्याचे श्रेय घेतल्याबद्दल भाजपने कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांमध्ये धमक असेल तर त्यांनी राज्यातील गुन्हेगारी थांबवून दाखवावी, असेही भाजपने म्हटले आहे.

गेल्या आठवडय़ापासून फरार असलेले काँग्रेसचे आमदार जे. एन. गणेश यांना अटक करण्याची धमकही कुमारस्वामी यांनी दाखवावी, असे आव्हानही भाजपने दिले आहे. एका रिसॉर्टमध्ये आनंद सिंह या आमदारावर हल्ला केल्याप्रकरणी गणेश यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपने केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर देताना कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की, भाजप सत्तेवर असताना पुजारी याला अटक का केली नाही. आमदार गणेश यांच्यावरही कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. रवी पुजारी याला अटक केल्याचे श्रेय मुख्यमंत्र्यानी घेण्याचा प्रकार म्हणजे एच. डी. देवेगौडा यांनी ओसामा बिन लादेन मारण्याचे श्रेय घेण्यासारखे आहे, असे कर्नाटक भाजपने ट्वीट केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2019 1:02 am

Web Title: karnataka cm kumaraswamy bjp in war of words over gangster ravi pujaris arrest
Next Stories
1 तृणमूलकडून मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांचा चुराडा
2 नव्या CBI संचालकांची निवड सर्वसहमतीने नाही, खरगे यांनी घेतला आक्षेप
3 रस्त्यावर भीक मागणाऱ्या सेवानिवृत्त जवानाच्या मदतीसाठी गौतम गंभीरचे आवाहन
Just Now!
X