24 February 2021

News Flash

कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सचिवांचा आत्महत्येचा प्रयत्न

शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन संतोष यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि नातेवाईक एन.आर. संतोष (३१) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना येत्या एक-दोन दिवसांत रुग्णालयातून घरी पाठविण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी शनिवारी सांगितले.

शुक्रवारी रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन संतोष यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे सूत्रांनी सांगितले. या बाबत माहिती मिळताच येडियुरप्पा यांनी शुक्रवारी रात्री तातडीने रुग्णालय गाठले आणि संतोष यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शनिवारी सकाळी आम्ही ४५ मिनिटे फेरफटका मारला, हे का घडले त्याची कल्पना नाही, आपण त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करू, असे येडियुरप्पा म्हणाले. सदाशिवनगर पोलिसांनी याप्रकरणी संतोष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 2:47 am

Web Title: karnataka cm political secretary n r santosh in hospital mppg 94
Next Stories
1 आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची मोदी सरकारची तयारी-अमित शाह
2 हैदराबादचं नाव भाग्यनगर करायला आलोय, योगी आदित्यनाथ यांची गर्जना
3 Coronavirus : या लढाईत शेजारी देशांसोबत अन्य देशांनाही सहकार्य करणं आपलं कर्तव्य – पंतप्रधान
Just Now!
X