26 September 2020

News Flash

कर्नाटक: रिसॉर्टमध्ये दोन काँग्रेस आमदारांमध्ये हाणामारी

कर्नाटकमध्ये आमदारांना रिसॉर्टला नेल्यानंतरही काँग्रेसला दिलासा मिळताना दिसत नाही.

कर्नाटकमध्ये आमदारांना रिसॉर्टला नेल्यानंतरही काँग्रेसला दिलासा मिळताना दिसत नाही. रविवारी रिसॉर्टमध्येच काँग्रेसचे दोन आमदार आनंद सिंह आणि जे एन गणेश हे एकमेकांना भिडले. (PTI Photo)(PTI5_23_2018_000160B)

कर्नाटकमध्ये आमदारांना रिसॉर्टला नेल्यानंतरही काँग्रेसला दिलासा मिळताना दिसत नाही. रविवारी रिसॉर्टमध्येच काँग्रेसचे दोन आमदार आनंद सिंह आणि जे एन गणेश हे एकमेकांना भिडले. दोघांमध्ये जबर हाणामारी झाल्याचे सांगण्यात येते. डोक्याला जखम झाल्याने आनंद सिंह यांना बंगळुरूतील एका रूग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश यांनी आनंद सिंह यांच्या डोक्यावर बाटलीने मारल्यामुळे ते जखमी झाले आहेत.

भाजपाने आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर काँग्रेसने आपल्या काही आमदारांना एका रिसॉर्टमध्ये नेले. हे आमदार शनिवारी रात्री उशिरापर्यंत पार्टी करत होते. याचदरम्यान या दोन आमदारांमध्ये वाद झाला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेएन गणेश काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या आणखी एका आमदाराच्या संपर्कात होते आणि ते भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत होते. याचवरून आनंद आणि गणेश यांच्या वाद झाला. आनंदने गणेश यांना ‘ऑपरेशन लोट्स’च्या अपयशास जबाबदार ठरवले. यावरून गणेश यांनी रागाच्या भरात आनंद यांच्या डोक्यावर बाटलीने मारले.

याप्रकरणी कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असलेले जमीर अहमद यांना असे काही झाले नसल्याचे स्पष्ट केले. तिन्ही आमदार एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात चर्चा होत होती आणि मित्रांमध्ये असे होत असते. हा एक छोटा वाद होता. कोणालाही टाके पडलेले नाहीत. कोणाला रक्तही आलेले नाही, असे त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 6:40 pm

Web Title: karnataka congress mla in hospital after brawl with colleague
Next Stories
1 भाजपा नेत्याकडून मायावतींची तृतीयपंथियाशी तुलना, बसपानं धाडली नोटीस
2 विरोधक आतापासूनच पराभवाची कारणे शोधत आहेत, इव्हीएमवरून मोदींचा टोला
3 पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात सरकारचे कर्ज ४९ टक्क्यांनी वाढले
Just Now!
X