News Flash

जेव्हा कुंपणच शेत खातं ! सट्टेबाजांवर कारवाई करणाऱ्या पथकातील पोलीस कर्मचारी चालवत होता स्वतःचा अड्डा

अटकेत असलेल्या दुसऱ्या आरोपीने माहिती दिल्यानंतर उघडकीस आला प्रकार

आयपीएलचे सामने म्हटले की देशभरात सट्टेबाजांचं पेव फुटतं. कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान आणि आयपीएलच्या हंगामात देशातील सर्व राज्यातील पोलिसांची या सट्टेबाजांवर नजर असते. अनेकदा सट्टेबाजांच्या अड्ड्यावर छापेमारी करत लाखोंचा मुद्देमाल जप्त झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. परंतू कर्नाटकात एका विचीत्र घटनेने तिकडचे पोलीस अधिकारीही चक्रावून गेले आहेत. राज्यातील सट्टेबाजांच्या कारवाईवर नियंत्रण आणण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्याने आपला स्वतःचा सट्टेबाजीचा अड्डा सुरु केला. महत्वाची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील एका मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी एका मोठ्या आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान या आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याचं नाव पुढे केलं आणि सगळेच चक्रावले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी हेड कॉन्स्टेबल मंजुनाथ याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंजुनाथ गेल्या काही दिवसांपासून स्वतःचा सट्टेबाजीचा अड्डा चालवत होता. “सट्टेबाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकात मंजुनाथ काम करत होता. ज्यावेळी पोलिसांची टीम एका सट्टेबाजीच्या किंवा जुगाराच्या अड्ड्यावर छापा टाकायची त्यावेळी मंजुनाथ तिकडची सर्व कार्यपद्धती समजवून घ्यायचा. याचा फायदा घेत त्याने स्वतःचा जुगार आणि सट्टेबाजीचा अड्डा सुरु केला. आपला स्वतःचा जुगार अड्डा सुरु करण्यासाठी मंजुनाथने अनेक नावाजलेल्या सट्टेबाजांचीही मदत घेतल्याचं समोर येतंय. इतकच नव्हे तर स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनाही मंजुनाथने पैसे देवून धाड पडणार असेल तर त्याची माहिती देण्यासाठी ठेवलं होतं.” चिक्कबलपुरा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक जी.के. मिथुन कुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

अटक करण्यात आलेला हेड कॉन्स्टेबल मंजुनाथला तात्काळ निलंबीत करण्यात आलं आहे. मंजुनाथला अटक केल्यानंतर प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे यामधून सावरल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान मंजुनाथसोबत या सट्टेबाजीत आणखी कोणी पोलीस अधिकारी सहभागी होते का याचा तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 4:28 pm

Web Title: karnataka cop part of squad to tackle ipl betting arrested for placing bets himself psd 91
Next Stories
1 आत्मनिर्भर भारत : भारतीय लष्करानं लाँच केलं व्हॉट्सअ‍ॅपसारखं मेसेजिंग अ‍ॅप
2 Coronavirus: विमान प्रवासापेक्षा किराणामाल खरेदी, हॉटेलिंगदरम्यान संसर्गाचा धोका अधिक
3 दिल्लीत करोनाची तिसरी लाट?; आरोग्यमंत्री म्हणतात, आता मास्कलाच समजा लस
Just Now!
X