16 October 2019

News Flash

कर्नाटक : डीआरडीओचे ड्रोन ‘रूस्तम -2’ कोसळले

परीक्षणादरम्यान मंगळवारी पहाटे घडली दुर्घटना

संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) चे ‘रूस्तम -2’ (अनमॅन्ड एरियल व्हिकल – युएव्हि ) हे ड्रोन कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यामधील जोडीचिकेनहल्ली भागात मंगळवारी पहाटे कोसळले.

प्राप्त माहितीनुसार, या ड्रोनची चाचणी घेतली जात असतानाच ते कोसळल्याने हे परीक्षण अयशस्वी ठरले. पहाटे साधरण सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना चित्रदुर्ग येथील चाचणी क्षेत्रापासून १७ किलोमीटर दूर अंतरावर घडली. घटनेबाबत माहिती मिळातच डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. हे ड्रोन कोसळण्यामागची कारणं शोधली जात आहेत.

डीआरडोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या परीक्षणाबाबत परिसरातील नागरिकांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हे ड्रोन कोसळल्यावर आसपासच्या परिसरातील नागरिकांना एका छोट्या विमानाचा अपघात झाला असल्याचे वाटले व त्यांनी घटनास्थळाकडे मोठ्या संख्येने धाव घेतली. यानंतर स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिसरात बंदोबस्त ठेवला.

काही दिवसांपूर्वीच डीआरडीओने आंध्र प्रदेशच्या कुर्नुलमधील फायरिंग रेंजवरून मॅन पोर्टेबल अ‍ॅन्टी टँक गाइडेड मिसाइलची यशस्वी चाचणी केली आहे. क्षेपणास्र प्रणालीतील ही तिसरी यशस्वी चाचणी होती. याला भारतीय सेनेच्या तिसऱ्या पिढीच्या रणगाडा भेदी क्षेपणास्राच्या आवश्यकतेसाठी विकसित केले गेले जात आहे. डीआरडीओने ही क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केली आहे. या क्षेपणास्राची तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी झाली आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या कामगिरीसाठी ‘डीआरडोओ’चे अभिनंदनही केले होते.

First Published on September 17, 2019 1:36 pm

Web Title: karnataka drdo drone rustam 2 collapses msr 87