News Flash

कर्नाटक विभागवार जागा: अशाप्रकारे भाजप झाला सगळ्यात मोठा पक्ष

जरी भाजपला बहुमत मिळाले नसले तरी राज्यातील भाजपचा प्रभाव वाढल्याचे या निवडणुकांच्या निकालानंतर दिसून येत आहे.

भाजपने शंभरचा आकडा गाठला

कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच भाजपने शंभरचा आकडा गाठला आहे. जरी भाजपला बहुमत मिळाले नसले तरी राज्यातील भाजपचा प्रभाव वाढल्याचे या निवडणुकांच्या निकालानंतर दिसून येत आहे. जाणून घेऊयात कर्नाटकमधील विभागवार जागा विभागणी…

दक्षिण कर्नाटक
५० जागा
काँग्रेस व धर्मनिरपेक्ष जनता दल यांच्यातच या भागात संघर्ष होता. मात्र जनता दलाने यात बाजी मारली. पण या विभागात भाजपने आपले अस्तित्व दाखवून दिले. जनता दलाने सर्वाधिक २० जागा या विभागात जिंकल्या. तर भाजपला १८ तर काँग्रेसला केवळ ११ जागा मिळाल्या. लिंगायत, वोक्कलिंग व मुस्लीम समाजाचे निर्णायक मतदान या विभागात आहे.

तटवर्ती कर्नाटक
२१ जागा
जातीयदृष्टय़ा संवेदनशील असा हा भाग. भाजप-संघाचे हे प्रभावक्षेत्र. या भागात भाजपने १८ जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ तीन जागा मिळाळ्या.

उत्तर कर्नाटक
८१ जागा
त्यात दोन उपविभाग येतात. त्यामध्ये मुंबई-कर्नाटक ५१ जागा, तर हैदराबाद-कर्नाटक विभागात ३१ जागा आहेत. लिंगायत समुदायाचे प्राबल्य असलेल्या या विभागात भाजपने मोठी मुसंडी मारली. भाजपला ४७, काँग्रेसला २७ तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला केवळ सात जागा मिळाल्या.

बंगळूरु
३४ जागा
बंगळूरु शहर लगतच्या परिसरात ३४ पैकी काँग्रेसने १५, भाजपने १२ तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने ७ जागा जिंकल्या.

मध्य कर्नाटक
३५ जागा
भाजपने अपेक्षेप्रमाणे २४ जागा जिंकत प्रभुत्व सिद्ध केले, तर काँग्रेसला ११ जागा मिळाल्या. जनता दलाचे येथे अस्तित्व नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 1:22 pm

Web Title: karnataka election this is how karnataka voted for bjp
Next Stories
1 Wow! दिल्ली- अमेरिका प्रवास करा फक्त १३ हजार ५०० रुपयांत
2 यस सर, यस मॅम नाही…’जय हिंद’ बोलून लागणार शाळेत हजेरी, मध्य प्रदेश सरकारचा आदेश
3 लिंगायत समाज भाजपच्याच पाठीशी
Just Now!
X