News Flash

काँग्रेसनं ट्विटरवर केला भाजपाचा पराभव

ट्विटरवर भाजपाच्या तुलनेत काँग्रेसचीच चर्चा

काँग्रेसने कर्नाटकात एकहाती सत्तेचा दावा केला होता. मात्र सिद्धरामय्यांना काय किंवा राहुल गांधींना काय ते शक्य झाले नाही. असे असले तरीही कर्नाटकात राजकीय पेच निर्माण झाला आहे. निवडणूक निकालाच्या दिवशी काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी केल्याने भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे दोन्ही पक्षांचे कसोशीचे प्रयत्न सुरु आहेत. अशात ट्विटरवर १५ मेच्या दिवशी म्हणजेच कर्नाटक निवडणूक निकालाच्या दिवशी सिद्धरामय्या टॉपचे नेते ठरले आहेत. याचाच अर्थ कर्नाटकात जरी भाजपा १०४ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरीही ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर सिद्धरामय्यांना नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.

नेटकऱ्यांनी आपल्या ट्विटमध्ये ज्यांचा उल्लेख केला आहे अशा पाच नेत्यांमध्ये सिद्धरामय्या पहिल्या क्रमांकावर, बी. एस. येडियुरप्पा दुसऱ्या क्रमांकावर, कुमारस्वामी तिसऱ्या क्रमांकावर, राजीव चंद्रशेखर चौथ्या क्रमांकावर तर शोभा करंदाले पाचव्या क्रमांकावर आहे. ट्विटरने त्यांचा इंटरनल डेटा शेअर केला आहे ज्यामध्ये क्रमांक एकवर सिद्धरामय्या आहेत.

एप्रिल महिन्यापासून कर्नाटक निवडणुकांसाठी रणमैदान पेटले होते. या काळात ट्विटरवचे ट्रेंड, ट्विटरवर चर्चिले जाणारे नेते या संबंधीची माहिती ट्विटरने समोर आणली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सिद्धरामय्या या दोघांनाही ५३ टक्के नेटकऱ्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये मेन्शन केले आहे. तर ४७ टक्के नेटकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि येडियुरप्पा या दोघांना ट्विटमध्ये मेन्शन केले आहे. पक्षासंदर्भात विचार केला तर भाजपा या पक्षाचा उल्लेख ५१ टक्के नेटकऱ्यांनी केला आहे. तर काँग्रेसचा उल्लेख ४२ टक्के नेटकऱ्यांनी केला आहे. जेडीएसचा उल्लेख ७ टक्के लोकांनी केला आहे.

कर्नाटक निवडणूक निकालाच्या दिवशी अनेक नेटकरी ब्रेकिंग न्यूज, राजकीय पक्ष, उमेदवार, निवडणूक निकालांबाबतची चर्चा याबाबतचे ट्विट करत होते असे ट्विटरने स्पष्ट केले आहे. #KarnatakaElections2018 हा हॅशटॅग सर्वात जास्त चर्चेत होता असेही स्पष्ट करण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून केलेल्या ट्विट्सना सर्वाधिक रिट्विट आणि लाइक्स मिळाल्याचेही ट्विटरने स्पष्ट केले.

#KarnatakaVerdict, #KarnatakaElections, #SarkaraBadalisiBJPGellisi and #KarnatakaElectionResults हे हॅशटॅगही चांगलेच ट्रेडिंगमध्ये होते असेही ट्विटरने आपल्या पत्रकात म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 4:47 pm

Web Title: karnataka elections 2018 on twitter siddaramaiah led congress outsmarts yeddyurappa led bjp
Next Stories
1 …तर कर्नाटकसाठी काँग्रेस जाणार सुप्रीम कोर्टात
2 इलेक्ट्रिक वाहनांसाठी दर तीन किमी अंतरावर चार्जिंग पॉईंट, केंद्राचा प्रस्ताव
3 पानमसाला खाणाऱ्या पतीला पत्नीने १५ दिवसांत सोडले
Just Now!
X