कर्नाटकातील बेंगळुरु येथे सुरु असलेल्या एअर शोमध्ये अपघाताचे सत्र सुरूच असून शनिवारी कार्यक्रम स्थळाजवळील पार्किंग तळावरील वाहनांना आग लागली.  या आगीत सुमारे ८० ते १०० कार जळून खाक झाल्या असून या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

बेंगळुरुजवळील यालहंका एअरबेसवर एअर शोचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर पार्किंग तळ आहे. एअर शोसाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी हे पार्किंग तळ होते. या पार्किंग तळावर शनिवारी दुपारी भीषण आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, या आगीत सुमारे ८० ते १०० गाड्या जळून खाक झाल्याचे वृत्त आहे.

एअर शोला अपघाताचे गालबोट लागल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी एअर शोसाठी सराव करत असताना दोन सूर्यकिरण विमानं कोसळली होती. यात एका वैमानिकाचा मृत्यू झाला होता.