News Flash

असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी कर्नाटक सरकारची मोठी घोषणा..!

मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी घेतला महत्त्वाचा निर्णय

शेतकरी, रिक्षाचालक तसंच टॅक्सीचालकांसाठी कर्नाटक सरकारने आता १२५० कोटी रुपयांचं कोविड रिलीफ पॅकेज जाहीर केलं आहे. या पॅकेजच्या माध्यमातून बांधकामाशी संबंधित कामगार, कलाकार आणि वेगवेगळ्या असंघटित क्षेत्रांमधल्या सर्वांना मदत मिळणार आहे. राज्यात लागू असलेल्या लॉकडाउनमुळे ज्यांच्या पोटापाण्यावर पाय येतो अशा लोकांसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱी आणि कॅबिनेट मंत्र्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी या रिलीफ पॅकेजची घोषणा केली आहे.

आमच्या सरकारने गेल्या वर्षीच्या लॉकडाउनच्या काळातही असंघटित क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत दिली होती. आता पुन्हा एकदा ती देणार असल्याची घोषणा करत आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे निर्बंध लावण्यात आले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसह असंघटित क्षेत्रांमधल्या कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे आम्ही १२५० कोटींहून अधिकचं पॅकेज जाहीर करत आहोत, असं मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सांगितलं.
ते पुढे म्हणाले, आम्ही जे काही करु शकत होतो ते आम्ही केलं आहे आणि यापुढेही गरज लागल्यास आम्ही करायला तयार आहोत.

आणखी वाचा- Coronavirus: मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच मोडले निर्बंध; मंदीर बंदीच्या आदेशानंतरही घेतलं देवदर्शन

लॉकडाउन वाढवायचा की नाही यावरही विचार चालू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. लॉकडाउन संदर्भातला निर्णय २४ मेपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या २४ मेपर्यंत लॉकडाउन लागू असणार आहे. २७ एप्रिलपासून राज्य सरकारने १४ दिवसांचा क्लोजडाउन घोषित केला होता, मात्र त्यानंतर १० मेपासून २४ मेपर्यंत कडक लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे.

येडियुरप्पा यांनी सांगितलं की, नोंदणीकृत बांधकाम कर्मचाऱी आणि मजुरांना प्रत्येकी ३००० रुपयांचं अर्थसाहाय्य दिलं जाणार आहे. हे एकूण पॅकेज ४९४ कोटी रुपयांचं आहे. तर सलूनचालक, टेलर, घरकाम करणारे, चर्मकार, मॅकेनिक अशा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रत्येकी २००० रुपये देण्यात येणार आहेत. तर आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत नोंदणीकृत असणाऱ्या रस्त्याकडेला विक्री करणाऱ्यांना प्रत्येकी २००० रुपये दिले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 4:36 pm

Web Title: karnataka government declared covid relief package for workers in unorganized sector vsk 98
Next Stories
1 म्युकरमायकोसिस! राजस्थानमध्ये ‘ब्लॅग फंगस’ आता साथीचा आजार
2 Coronavirus: मुख्यमंत्र्यांच्या मुलानेच मोडले निर्बंध; मंदीर बंदीच्या आदेशानंतरही घेतलं देवदर्शन
3 दिल्लीत ब्लॅक फंगसमुळे पहिला मृत्यू
Just Now!
X