देशात येत्या १७ मे रोजी तिसरा लॉकडाउन संपून चौथ्या लॉकडाउनला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जनतेला निर्बंधांमधून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात १८ मे पासून जीम उघडल्या जाऊ शकतात तसेच गोल्फ कोर्सवर नागरिकांना गोल्फ खेळण्याचा आनंद घेता येईल.
१७ मे नंतर हॉटेल, सलून उघडायलाही परवानगी मिळू शकते. कर्नाटकातील मंत्री सीटी रवी यांनी ही माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. कर्नाटकात करोनाचे ९५१ रुग्ण असून ४४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. त्याचवेळी १८ मे पासून चौथा लॉकडाउन अस्तित्वात येईल असे सांगितले. पण त्यात नवे नियम असतील. म्हणजे मोठया प्रमाणावर निर्बंधांमधून मोकळीक मिळण्याची एक शक्यता आहे. केरळ पाठोपाठ कर्नाटकाने करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे.