News Flash

‘या’ राज्यात १७ मे नंतर उघडले जाऊ शकते जीम, हॉटेल, सलून

देशात येत्या १७ मे रोजी तिसरा लॉकडाउन संपून चौथ्या लॉकडाउनला सुरुवात होणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

देशात येत्या १७ मे रोजी तिसरा लॉकडाउन संपून चौथ्या लॉकडाउनला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील जनतेला निर्बंधांमधून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कर्नाटकात १८ मे पासून जीम उघडल्या जाऊ शकतात तसेच गोल्फ कोर्सवर नागरिकांना गोल्फ खेळण्याचा आनंद घेता येईल.

१७ मे नंतर हॉटेल, सलून उघडायलाही परवानगी मिळू शकते. कर्नाटकातील मंत्री सीटी रवी यांनी ही माहिती दिली. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. कर्नाटकात करोनाचे ९५१ रुग्ण असून ४४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल देशाला संबोधित करताना २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. त्याचवेळी १८ मे पासून चौथा लॉकडाउन अस्तित्वात येईल असे सांगितले. पण त्यात नवे नियम असतील. म्हणजे मोठया प्रमाणावर निर्बंधांमधून मोकळीक मिळण्याची एक शक्यता आहे. केरळ पाठोपाठ कर्नाटकाने करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:31 pm

Web Title: karnataka govt likely to allow restaurants salons gyms to open after may 17 dmp 82
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे ‘मेक इन इंडिया’चं बदललेलं नाव-थरुर
2 तरुण बेरोजगारांची संख्या वाढली; एप्रिलमध्ये २० ते ३० वयोगटातील २ कोटी ७० लाख कामगारांच्या गेल्या नोकऱ्या
3 वडोदरा : लॉकडाउनमध्ये बर्थ-डे पार्टी, भाजप वॉर्ड अध्यक्षासह ८ जणं अटकेत
Just Now!
X