लॉटरी घोटाळा प्रकरणी निलंबित एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यास  करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त आलोक कुमार (पश्चिम बंगळुरू) असे त्यांचे नाव असून ते लॉटरी घोटाळ्यातील म्होरक्या पारी राजन याला ओळखतात व त्यांचे दूरध्वनीवर संभाषण झाले; तसेच त्यांच्या बैठकाही झाल्या होत्या. राजन हा सध्या पोलिस कोठडीत आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त आलोक कुमार यांना पुढील चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांची चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. कुमार हे बेकायदेशीर रीत्या राजन याच्या संपर्कात होते व लॉटरी घोटाळ्याच्या चौकशीत हस्तक्षेप करीत होते. पोलिस महासंचालकांच्या शिफारशीवरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून बेकायदेशीर कारवायात आरोपीला मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले, की सीआयडीच्या अंतरिम अहवालावरून कारवाई करण्यात आली. सदर अधिकारी हा राजन याच्या संपर्कात असल्याचे प्राथमिक पुरावे आहेत. त्यांनी उपनिरीक्षकास राजनला अटक न करण्याचे आदेश दिल्याचे समोर आले आहे. राजनला ओळखत असल्याचे कुमार यांनी कबूल केले असून लॉटरी घोटाळ्यात हात नसल्याचे म्हटले आहे. चौकशी पक्षपातीपणे होऊ नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.