News Flash

विसरू नका २००२ मध्ये काय झालं; कर्नाटकातील मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

रवी यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमात व्हायरल झाला आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. तर अनेक ठिकाणी याविरोधात केल्या जाणाऱ्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. यादरम्यान, या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या अल्पसंख्यांकांविरोधात कर्नाटकातील मंत्री सी.टी. रवी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जर लोकांनी आपला संयम गमावला तर गोध्रासारखे दंगे पुन्हा होऊ शकतात, असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.

कर्नाटकाचे पर्यटन मंत्री सी.टी.रवी यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमात व्हायरल झाला आहे. यामध्ये ते माध्यमांशी संवाद साधत आहेत. तुम्ही विसरलायत जर लोकांनी आपला संयम गमावल तर काय होतं. तुम्ही मागे वळून पाहिला आणि आठवा गोध्रानंतर काय झालं होतं. आमच्या संयमाचा अंत पाहू नका, असं ते या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात होत असलेल्या आंदोलनावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही पाहतोय की तुम्ही कसं सरकारी संपत्तीचं नुकसान करत आहात. आमचा संयम आमचा कमकुवतपणा समजू नका, असंही ते म्हणाले. रवी यांच्या या वक्तव्याच्या सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. तसंच यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश गुंडू राव यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच वक्तव्य म्हणजे एकप्रकारे देण्यात आलेली धमकी आहे. एका पदावर असताना त्यांनी अशा प्रकारची भाषा वापरणं योग्य नाही. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे, असंही त्यानी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 12:23 pm

Web Title: karnataka minister c t ravi speaks about caa violation minority controversial statement godhra jud 87
Next Stories
1 CAA मुळे देशाच्या धार्मिक ऐक्यावर गदा येण्याची शक्यता -पवार
2 CAA : “वाजपेयी असते, तर भाजपाला राजधर्माची आठवण करुन दिली असती”
3 #CAA : नागरिकत्व नोंदणी राष्ट्रव्यापी नाही
Just Now!
X